वांद्रे-वरळी सी-लिंकवरील प्रवास आजपासून महागला

मुंबई वांद्रे वरळी सी-लिंकवरील प्रवास आता महागणार आहे. मुंबईकरांना टोलसाठी आता जादाचे पैसे मोजावे लागणार आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.

shailesh musale Updated: Apr 1, 2018, 10:05 AM IST
वांद्रे-वरळी सी-लिंकवरील प्रवास आजपासून महागला

मुंबई : मुंबई वांद्रे वरळी सी-लिंकवरील प्रवास आता महागणार आहे. मुंबईकरांना टोलसाठी आता जादाचे पैसे मोजावे लागणार आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.

किती असणार दर

कारधारकांना एका बाजुनं 60 ऐवजी 70 रूपये मोजावे लागणार आहेत. तर दोन्ही बाजुच्या प्रवासासाठी 90 ऐवजी आता 105 रूपये मोजावे लागणार आहेत. मासिक पासच्या दरांतही मोठी वाढ करण्यात आली आहे. 

मासिक पासही महागला

मासिक पासचे दरही 3 हजारांवरून साडे तीन हजार रूपये करण्यात आलाय. त्यामुळं आता मुंबईकरांना वांद्रे वरळीचा प्रवालस महाग ठरणार आहे. सुरूवातीपासूनच वांद्रे-वरळी सी-लिंकवरून अपेक्षित उत्पन्न मिळालेलं नाही. त्यामुळं हे दर वाढवण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे.