मुंबईत मध्य रेल्वेचा १ एप्रिल रोजी मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर रविवार, १ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Jaywant Patil Updated: Apr 1, 2018, 12:06 AM IST
मुंबईत मध्य रेल्वेचा १ एप्रिल रोजी मेगाब्लॉक title=

मुंबई : रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवार, १ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी या अप-डाउन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील भांडुप स्थानकात पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीसाठी शनिवारी-रविवारी मध्यरात्री साडे पाच तासांचा अप-डाउन जलद मार्गावर ब्लॉक आहे.

मेल-एक्स्प्रेस १५ ते २० उशीराने धावणार 

मध्यरात्री ००.१० ते पहाटे ५.४५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असून मेल-एक्स्प्रेस १५ ते २० उशीराने धावणार आहेत. १ एप्रिल तारीख असली, तरी रेल्वेने तुमच्यासोबत एप्रिल फूल केलं आहे, असं समजू नका, तर दुरूस्तीसाठी हा मेगाब्लॉक आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात रविवारी रेल्वेकडून दुरूस्तीची कामे केली जातात. या वर्षी रेल्वेकडून जास्त मेगा ब्लॉक घेण्यात आले.