Shiv Sena Symbol Row LIVE : संपूण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाण (Shiv Sena Symbol) निवडणुक आयोगासमोर सुनावणी (Election Commission India) महासुनावणी सुरु आहे. शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटात जोरदार चढाओढ सुरु आहे. दोन्ही गटातर्फे वकिलांची फौैज निवडणुक आयोगासमोर आपली बाजू मांडत आहेत. यामुळे धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. त्यातच या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कायदेतज्ञ उज्वल निकम यांनी मोठा दावा केला आहे. शिवसनेचं धनुष्यबाण चिन्हच कायमचं गोठवले जाऊ शकतं अशी शक्यता उज्वल निकम (Ujwal Nikam) यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा याचा फैसला आता 20 जानेवारीला होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकललीय. आयोगासमोर कागदपत्रांवरून दोन्ही गटांमध्ये शिंदे आणि ठाकरे गटानं जोरदार युक्तिवाद केला. तर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी घाईघाईनं निर्णय़ देऊ नये अशी मागणी आयोगासमोर केली. त्यामुळे आता पुढच्या सुनावणीत आयोग निकाल देणार की नाही याबाबत उत्सुकता वाढली आहे.
धनुष्यबाण चिन्हावर ठाकरे आणि शिंदे गटात लढाई सुरु आहे. निवडणुक आयोग यावर निर्णय देणार आहे. धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबत कायदेतज्ञ उज्वल निकम यांनी खूप मोठा दावा केला आहे. 16 आमदारांच्या पात्रतेचा निर्णय सर्वेच्च न्यायालात प्रलंबित आहे. शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्ययालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे. धनुष्यबाण कोणाला मिळणार हे निवडणूक आयोग ठरवले. आमदारांच्या पात्रता अपात्रता हा निवडणुक आयोगापुढचा विषय नाही. पक्षाची घटना तपासून निवडून आलेले प्रतिनिधी कोणाच्या बाजूने निवडूण आले ही बाब निवडणूक आयोग तपासणार. या सर्व प्रक्रियेला वेळ लागू शकतो. यामुळेच निवडणूक आयोग शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कायमचं गोठवू शकते अशी शक्यता उज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे.
शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाने केला आहे. विजय चौगुलेंसह 7 जिल्हाप्रमुखांवर आक्षेप घेण्यात आला आहे. शिंदे गटाने सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगामध्ये सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे पुरावे असल्याचा ठाकरे गटाचा दावा. निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये माजी जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांना जिल्हाप्रमुख म्हणून दाखवण्यात आल्याचे पुरावे देण्यात आले. सात जिल्हाप्रमुखांवर आक्षेप घेण्यात आला आहे.
शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी यांनी आज निवडणूक आयोगा पुढे आम्ही सादर केलेला कागदपत्रांमध्ये कुठलीही त्रुटी नसल्याचा केला आहे दावा केला आहे.
ऑक्टोबर 2022 मध्ये अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लागली होती. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे नाव धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ लागली होती. अखेर शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही गटांना वापरता येणार नाही. असा निर्णय देत निवडणुक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटासा जबरदस्त झटका दिला. यांनतर शिंदे गट ढाल-तलवार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरला. तर, ठाकरे गटाने मशाल चिन्हावर ही निवडणुक जिंकली. यावेळी पक्षाच्या नावाबाबतही निर्णय झाला होता. ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले. तर, शिंदे गटाने ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळले.