मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांनाही ईडीचं समन्स बजावण्यात आले आहे. वर्षा राऊत यांना आज चौकशीला बोलावण्यात आलंय. पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊत यांना समन्स बजावण्यात आलंय. संजय राऊत यांच्यापाठोपाठ आता वर्षा राऊत यांच्याही अडचणी वाढणार आहेत. वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमधून संशयास्पद व्यवहार झाल्याचं ईडीचं म्हणणं आहे.
संजय राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलीय. राऊतांची आणखी चौकशी करण्यासाठी ईडीनं सहा दिवसांची कोठडी मागितली होती. कोर्टानं राऊतांना आणखी चार दिवसांची कोठडी दिलीय.
उत्तर प्रदेश कॉंग्रेस प्रभारी प्रियंका गांधींचा पाठिंबा
प्रियंका गांधींनी संजय राऊतांना पाठिंबा दिलाय. धमक्या, छळ, कपटानं सत्ता हिसकावून घेणं आणि लोकशाही चिरडून टाकणं हे भाजपचं एकमेव लक्ष्य आहे. संजय राऊत आणि त्यांचा परिवार भाजपच्या छळ-कपटाच्या राजकारणाला घाबरत नाही आणि त्याचा निधड्या छातीनं सामना करतात, म्हणूनच राऊतांवर हल्ले केले जाताय, असं प्रियंका गांधींनी म्हटलंय.