एपीएमसीमध्ये विक्रमी आवक झाल्याने भाज्यांचे दर घसरले

मुंबई आणि मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबईला भाजी पुरवठा करणा-या नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये भाजीपाल्याची विक्रमी आवक झालीय. 

Updated: Sep 4, 2017, 04:44 PM IST
एपीएमसीमध्ये विक्रमी आवक झाल्याने भाज्यांचे दर घसरले

नवी मुंबई : मुंबई आणि मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबईला भाजी पुरवठा करणा-या नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये भाजीपाल्याची विक्रमी आवक झालीय. 

सरासरी दररोज ५०० ते ५५० गाड्याची आवक होते. मात्र ही आवक साडेआठशे गाड्यांवर गेलीय.. 

गणेशोत्सव, पाऊस आणि सुट्यामुळे शेतक-यांनी शेतातला शेतमाल बाजारात पाठवला. त्यामुळे एपीएमसीमध्ये भाज्यांची आवक वाढलीये. 

वर्षभरातली अश्या पद्धतीने विक्रमी आवक होण्याची ही दुसरी वेळ आहे. विक्रमी आवक झाल्यामुळे भाज्यांचे भाव ३० टक्क्यांनी घसरलेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय.