close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गणपती विसर्जनासाठी मुंबई सज्ज

उद्या अनंत चतुदर्शी असून विसर्जनासाठी मुंबई सज्ज झालीय. सर्वाधिक गणपती विसर्जन जिथं केलं जातं त्या गिरगाव चौपाटी इथं विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आलीय.

Updated: Sep 4, 2017, 04:34 PM IST
गणपती विसर्जनासाठी मुंबई सज्ज

मुंबई : उद्या अनंत चतुदर्शी असून विसर्जनासाठी मुंबई सज्ज झालीय. सर्वाधिक गणपती विसर्जन जिथं केलं जातं त्या गिरगाव चौपाटी इथं विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आलीय.

विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर मोठी गर्दी उसळते. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका सज्ज आहे. तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस यंत्रणाही सज्ज झालीय.

पुण्यात गणेशोत्सवाचं १२५वं वर्ष आहे. पुण्यातही गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झालीय. महापालिकेतर्फे शहरात २५५ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलीये.