मुंबई : मुंबईत धावणारी भुयारी मेट्रो कशी असेल, याची झलक दाखवणारा खास व्हिडिओ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं जारी केलाय. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते काळबादेवी दरम्यान मेट्रोचा भुयारी मार्ग दाखवणारा हा व्हिडिओ आहे. सध्या मेट्रोच्या कामामुळं मुंबईकर हैराण आहेत. मात्र एकदा मेट्रो रेल सुरू झाल्यानंतर नेमका प्रवास कसा असेल? हे यातून दिसतंय.
Want to experience a quick underground tour in Metro tunnel between #CST & #Kalbadevi ? Watch this. #MumbaiUnderground #MakingMumbaiAwesome pic.twitter.com/9h5A3LNQwr
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) October 10, 2019
मुंबई मेट्रोच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या अकाऊंटद्वारे वेळोवेळी मेट्रोच्या विविध कामांची माहिती जनतेसोबत शेअर केली जातेय.
जमिनीखालून मेट्रोचा प्रवास हा दिल्लीकरांसाठी नवीन नाही. परंतु, मुंबईकरांना मुंबई मेट्रोद्वारे पहिल्यांदाच हा अनुभव घेता येणार आहे. अद्याप मेट्रो ३ ची कामं ठिकठिकाणी सुरू असली तरी हा प्रवास कसा असू शकेल, याची छोटीशी झलक या व्हिडिओतून तुम्ही पाहू शकता.