मुंबई : राज्यसभा निवडणुकीतल्या धक्कादायक निकालानंतर आज महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात विधान परिषदेचा सामना होत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. कारण काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचा विषयी काँग्रेसने तक्रार केली आहे. या आमदारांऐवजी त्याचे समवेत इतर सहकारीने मतपत्रिका बाँक्स मध्ये टाकल्या असा आक्षेप काँग्रेसकडून घेण्यात आला आहे.
पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी विधान परिषदेसाठी मतदान केलं. मुक्ता टिळक या कॅन्सरनं त्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र तरी देखील मतदान करण्यासाठी त्या विधानभवनात आल्या. पक्षाने दिलेले आदेश मानायचे हे पहिल्यापासून आमच्या रक्तात आहे. त्यामुळे मतदाना केल्याचं मुक्ता टिळक यांनी सांगितलं.
मुक्ता टिळक यांना विधानभवनात व्हीलचेअरवरून नेण्यात आलं. मुक्ता टिळक यांचं विधानभवनात फडणवीसांसह भाजप नेत्यांनी स्वागत केलं. त्यानंतर मुक्ता टिळक यांनी मतदान केलं. मुक्ता टिळक यांना पुन्हा सोडण्यासाठी फडणवीसांसह भाजप नेते दाखल झाले होते.
भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे देखील काही महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पण अशातही आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी ते मुंबईत आले आहेत.