Vidhan Parishad Election : देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा घडवला चमत्कार, पाचही उमेदवार विजयी

'विधानपरिषद झाँकी है, विधानसभा बाकी है' विजयानंतर भाजपाचा जल्लोष

Updated: Jun 20, 2022, 10:43 PM IST
Vidhan Parishad Election : देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा घडवला चमत्कार, पाचही उमेदवार विजयी title=

मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर (Rajyasabha Election) महाविकास आघाडी सरकारला विधान परिषद निवडणुकीतही (Vidhan Parishad Election) मोठा धक्का बसला आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपचे (BJP) पाचही उमेदवार विजयी झाले आहेत.

राज्यसभेनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधान परिषद निवडणुकीतही चमत्कार घडवला आहे. भाजपचे पाचही उमेदवार फडणवीस यांनी निवडून आणले आहेत. 

विधान परिषदेच्या नवव्या आणि दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड (Prasad Lad) आणि काँग्रेसचे भाई जगताप तसंच चंद्रकांत हंडोरे  (Bhai Jagtap) यांच्यात जोरदार चुरस होती. पण अखेर प्रसाद लाड यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची रणनिती पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे. 

भाजपने पाच उमेदवार दिले होते, त्यापैकी चार उमेदवार विजयी होणार हे निश्चित होतं. त्यानुसार राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे विजयी ठरले. तर पाचव्या जागेसाठी प्रसाद लाड यांची भाई जगताप यांच्याशी चुरस होती. पण प्रसाद लाड यांनीही बाजी मारल्याने देवेंद्र फडणवीस यांची जादू पुन्हा चालली.

भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाल्यानंतर भाजपच्या आमदारांनी एकच जल्लोष केला. 

भाजपचे विजयी उमेदवार

1. प्रविण दरेकर - 29 मतं

2. श्रीकांत भारतीय - 30 मतं

3. राम शिंदे - 30 मतं

4. उमा खापरे - 27 मतं

5. प्रसाद लाड - 

भाजपची रणनिती यशस्वी
भाजपचे एकूण 106 आमदार आहेत. तर अपक्षांसह भाजपचं संख्याबळ 113 इतकं होतं.  विजयासाठी उमेदवाराला 26 मतांची आवश्यकता होती. त्यामुळे भाजपची 13 मतं प्रसाद लाड यांना ट्रान्सफर होणार हे निश्चित होतं. पण उर्वरित मतं घेत लाड यांनी विजयी मतांचा कोटाही पूर्ण केलाय. भाजपाला पहिल्या फेरीत 133 आणि शिवसेनेला 52  मतं मिळाली आहेत. शिवसेनेची दोन मतं फुटल्याची शक्यता आहे. त्यामुळे सेनेची घटलेली मतं हा चिंतेचा विषय आहे.