ओखी चक्रीवादळ : ४ आणि ५ डिसेंबरला सतर्कतेचा इशारा

सध्या हे वादळ मुंबईच्या समुद्रालगत दक्षिणेकडे १ हजार कि.मी वर स्थित आहे. 

Updated: Dec 3, 2017, 09:23 AM IST
ओखी चक्रीवादळ : ४ आणि ५ डिसेंबरला सतर्कतेचा इशारा  title=

मुंबई : येत्या ४ आणि ५ डिसेंबरला सतर्क रहा... कारण तमिळनाडू, केरळमध्ये हाहाकार उडवणारे ओखी चक्रीवादळ आता अरबी समुद्रात तयार झालं आहे.

सध्या हे वादळ मुंबईच्या समुद्रालगत दक्षिणेकडे १ हजार कि.मी वर स्थित आहे. 

हवामान तज्ञांचा इशारा 

६ डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होत ते पुढे सरकेल. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील सागरी किनारी समुद्र खवळलेला असेल.

त्यामुळे ४ आणि ५ डिसेंबर या दोन दिवशी मासेमारांनी सुमद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, लहान बोटींनी सुद्धा समुद्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा हवामान तज्ञांनी दिलाय.

पावसाची स्थिती 

 मुंबईसह सागरी किनाऱ्यांवर ४ तारखेला अंशत: तसेच ५ तारखेला पावसाचीही स्थिती राहू शकते. ५ तारखेला मुंबई, कोकणात सागरी भागात वाऱ्याची तीव्रता अधिक असेल.

नागरिकांनी सतर्क राहा 

 त्याहीदृष्टीने नागरिकांनी सतर्क असावे. यामुळे किमान तापमानात वाढ होईल आणि थंडी काही प्रमाणात कमी होईल असं इशारा देणारं पत्रक सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलंय.