'दादर' रेल्वे स्टेशनवर अजगर! 'त्या' फोटोमागचे व्हायरल सत्य

गेले काही दिवस दादर रेल्वे स्टेशन फलाटावरच अजगर आल्याचे दाखवणारा एक फोटो व्हायरल होत आहे.  २४ तास डॉट कॉमने या फोटोची सत्यता तपासण्याचा प्रयत्न केला असता, भलतेच सत्य पुढे आले.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 31, 2017, 11:51 PM IST
'दादर' रेल्वे स्टेशनवर अजगर! 'त्या' फोटोमागचे व्हायरल सत्य title=
छायाचित्र सौजन्य - सोशल मीडिया

मुंबई : गेले काही दिवस दादर रेल्वे स्टेशन फलाटावरच अजगर आल्याचे दाखवणारा एक फोटो व्हायरल होत आहे.  २४ तास डॉट कॉमने या फोटोची सत्यता तपासण्याचा प्रयत्न केला असता, भलतेच सत्य पुढे आले.

फलाटावरील वीजेच्या खांबावर एक अजगर शिरल्याचा हा तो फोटो. हा फोटो कुणी काढला, कसा काढला. याबाबत काहीही माहिती उपलब्ध नाही. गेले काही दिवस सोशल मीडियात हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. खास करून या फोटोने व्हॉट्सअॅपवर जोरदार धुमाकूळ घातला आहे.

सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवार. कधी अंगाशी येईल याचा नेम नाही. सोशल मीडियातून व्हायरल होणाऱ्या फोटोंवरून ही बाब तर, अधिक प्रमाणात अधोरेकीत होते. दादर रेल्वेस्टेशनवरील या फोटोबाबत हेच सिद्ध होते. हा फोटो व्यक्तीगत रित्या किंवा व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून अनेकांच्या स्मार्टफोनवर झळकला. अनेकांनी लागलीच स्मार्टगिरी दाखवली आणि पळा पळा कोण पुढे पळतो या उक्तीप्रमाणे पुढे अनेकांना फॉरवर्ड केला.

हा फोटो फॉरवर्ड करताना अनेकांनी कोणतीही शहानिशा केली नाही. हा फोटो थोडा जरी झूम करून पाहिला असता आणि डोळे उघडे ठेवले असते तरी, त्याचे सत्य पुढे आले असते. फोटो झूम करून पाहिला असता फोटोत बॅकग्राऊंडला रेल्वेस्टेशनवर बेंगलोर पोलिसांचा बोर्ड दिसत आहे. साधी गोष्ट अशी की, बेंगलोर पोलीस मुंबईत येऊन तर, जाहीरात करणार नाहीत. त्यामुळे हा फोटो मुंबईतील नसावा असे प्रथमदर्शनी लक्षात येते. पण, हे स्मार्ट दुनियेत हरवलेल्या मंडळींच्या ध्यानात कसे यावे? तर, असे आहे या फोटोचे व्हायरल सत्य...