गेट-वे ऑफ इंडियावर अमेरिकेच्या 'डान्सिंग डॅड'चा 'बन ठन चली' गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल

अमेरिकेतील ''dancing dad' रिकी पाँड यांचा प्रसिद्ध बॉलिवूड गाणं 'बन ठन चली...'वर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  मुंबईत गेट-वे ऑफ इंडियासमोर त्यांनी हा डान्स केला.   

शिवराज यादव | Updated: Sep 2, 2024, 05:15 PM IST
गेट-वे ऑफ इंडियावर अमेरिकेच्या 'डान्सिंग डॅड'चा 'बन ठन चली' गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल  title=

सोशल मीडिया स्टार आणि अमेरिकेतील 'डान्सिंग डॅड' रिकी पाँड यांनी इंस्टाग्रामला एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत रिकी पाँड आपला मुलगा डॅलिनसह प्रसिद्ध बॉलिवूड गाणं 'बन ठन चली...'वर डान्स करताना दिसत आहेत. मुंबईत गेट-वे ऑफ इंडियासमोर त्यांनी हा डान्स केला असून नेटकऱ्यांना तो प्रचंड आवडला आहे. 

हा व्हिडीओ इंस्टाग्रामला धुमाकूळ घालत असून मुंबईतील डान्सिंग कॉप म्हणून प्रसिद्ध असणारे अमोल कांबळे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

व्हिडीओत रिकी पाँड आपल्या मुलासह गेट-वे ऑफ इंडियासमोर उभे असल्याचं दिसत आहे. यानंतर काही वेळातच ते डान्स सुरु करतात. अत्यंत सहजपणे ते 'बन ठन चली...' गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. यादरम्यान त्यांच्या मागे गेट-वे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ricky Pond (@ricky.pond)

रिकी पाँड आणि त्याच्या मुलाची ऊर्जा आणि अचूक स्टेप्सने नेटकरी भारावले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये तर जणू पूरच आला आहे. अनेकांनी त्यांचं मुंबईत स्वागत केलं आहे. तुम्हा दोघांना मुंबईत पाहून फार आनंद झाल्याचं ते सांगत आहेत. 

मुंबईचे प्रख्यात 'डान्सिंग कॉप' यांनी कमेंट करत म्हटलं आहे की,  “तुम्ही आमच्या भारतीय कुटुंबातील सदस्य आहात याचा आम्हाला आनंद आहे. भारताकडून खूप प्रेम." दुसऱ्या एका युजरने, "आनंद वाटत असल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आणि तुमचा मुलगा आश्चर्यकारक डान्सर आहात! मुंबईत आनंद घ्या", असं लिहिलं आहे. 

रिकी पाँड यांचे भारतात अनेक फॉलोअर्स, चाहते आहेत. सोशल मीडियावर ते रिल्सवर डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतात. यामध्ये अनेक बॉलिवूड गाणी असतात. हसरा चेहरा, उत्तम नृत्य यामुळे ते भारतीयांना फार आवडतात.