विरार : आज सलग दुसऱ्या दिवशी विरारमध्ये १२ गावांचा संपर्क तुटला आहे. भाताने पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्यानं ही परिस्थिती उद्धभवली आहे. आज सकाळ पासून पावसाने उसंत घेतल्याने पुलावरील पाण्याची पातळी कमी झाली पण अजूनही वाहतूक सुरु होऊ शकलेली नाही. त्यामुळे गावांचा संपर्क तुटलेलाच आहे.
भाताने ,नवसइ, थळ्याचापाडा, आडणई, जाभुलपाडा, काजूपाडा, भूतपाडा, बेलवली, हत्तीपाडा, भूकटपाडा, भोईरपाडा, तेलपाडा असे संपर्क तुटलेल्या १२ गावांची नावं आहेत.
मुंबई-अहमादाबाद महामार्गावरील पाणी आज सकाळपासून ओसरलय. मुंबई आणि गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत आहे. वसई हद्दीतील ससुपाडा येथे महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने काल दिवसभर वाहतुकीचा खेळखंडोबा झाला होता.