संजय निरुपम विरुद्ध वारीस पठाण; झी न्यूजच्या चर्चासत्रात हिंदुत्व, संविधानाच्या मुद्द्यावरुन घमासान!

Waris Pathan VS Sanjay Nirupan:  या कार्यक्रमात एमआयएमचे प्रवक्ते वारीस पठाण आणि शिवसेनेचे प्रवक्ता संजय निरुपम यांच्यात विविध मुद्द्यांवरुन घमासान पाहायला मिळाले.

Pravin Dabholkar | Updated: Sep 28, 2024, 04:59 PM IST
संजय निरुपम विरुद्ध वारीस पठाण; झी न्यूजच्या चर्चासत्रात हिंदुत्व, संविधानाच्या मुद्द्यावरुन  घमासान! title=
संजय निरुपम विरुद्ध वारीस पठाण

Waris Pathan VS Sanjay Nirupan: झी न्यूजचा एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम मुंबईत पार पडतोय. या कार्यक्रमात एमआयएमचे प्रवक्ते वारीस पठाण आणि शिवसेनेचे प्रवक्ता संजय निरुपम यांच्यात विविध मुद्द्यांवरुन घमासान पाहायला मिळाले. भारतात विविधता असली तर राष्ट्रीयतेच्या भावनेत एकता आहे. राज्य आणि केंद्रामधील विविध विषयांवरील संवाद वाढवणे हा एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाचा उद्देश आहे. झी न्यूजच्या कार्यक्रमाला राजधानी दिल्लीतून सुरुवात झाली. त्यानंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत हा कार्यक्रम होतोय. या मंचावरुन राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा विविध विषयावंर चर्चा होत आहेत. 

महाराष्ट्रात निवडणुका होतायत. हा टप्पा हरणार हे भाजपला माहितीय. त्यांनी भडकाऊ भाषण करायला सुरुवात केलीय. रामगिरी महाराज वादग्रस्त भाषण करतात, नितेश राणे येऊन मशिदीत घुसून निवडून मारेन असं म्हणतात. त्यांच्यावर एफआयआर असून अटक करत नाही. म्हणून आम्ही मुंबईत येऊन तिरंगा रॅली काढण्याचे आवाहन केल्याचे वारीस पठाण म्हणाले. यावर संजय निरुपम यांनी उत्तर दिले. कोणी धमकी देऊ नये. जर धोका असता तर वारीस पठाण इथे सुरक्षित बसले असते का? वारीस पठाण सारखे लोक मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करतात, अस निरुपण म्हणाले. 

पंतप्रधान, गृहमंत्री सर्व हिंदू असून हिंदु धोक्यात कसा? वादग्रस्त विधान मी केलं असतं तर आज तुरुंगात असतो पण नितेश राणे खुलेआम फिरतोय. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करु नका.आम्हाला छेडू नका, अन्यथा आम्ही सोडणार नाही, असे वारीस पठाण म्हणाले. 

नितेश राणेंवर दोन एफआयर झालाय. कायदा आपलं काम करतोय. पण तुम्ही ज्याप्रकारची भाषा वापरताय, तेदखील संविधान नाही, असे प्रत्युत्तर संजय निरुपम यांनी दिले. तुम्ही लोकांच्या मनात भीती निर्माण करताय, हे बंद करा, असे ते म्हणाले.

वक्फ संशोधनाच्या नावाखाली आमची जमीन हडप करायची आहे. एकाच समुदयाच्या साऱ्या गोष्टी हडप करायला चालले आहेत, अशी टीका वारीस पठाण यांनी यावेळी केली. वक्फ बोर्ड संशोधनाचा उद्देश कोणाची जमीन हडपण्याचा नाही. यात पारदर्शकता आहे. वक्फ बोर्डाचा सामान्य मुस्लिमांशी काही संबंध नाही, असे प्रत्युत्तर संजय निरुपम यांनी दिले.