भाजप-शिंदे जादूगार; 15 लाख बोलून 1500 दिले, पुढच्या वेळेस 15 रुपये देतील- ठाकरेंचा टोला

Aaditya Thackeray interview: सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभादेखील जिंकू असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 28, 2024, 04:24 PM IST
भाजप-शिंदे जादूगार; 15 लाख बोलून 1500 दिले, पुढच्या वेळेस 15 रुपये देतील- ठाकरेंचा टोला title=
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray interview: झी न्यूजचा एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम मुंबईत पार पडतोय. या कार्यक्रमाला आमदार आदित्य ठाकरे यांची उपस्थिती लाभली. भारतात विविधता असली तर राष्ट्रीयतेच्या भावनेत एकता आहे. राज्य आणि केंद्रामधील विविध विषयांवरील संवाद वाढवणे हा एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाचा उद्देश आहे. झी न्यूजच्या कार्यक्रमाला राजधानी दिल्लीतून सुरुवात झाली. त्यानंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत हा कार्यक्रम होतोय. या मंचावरुन राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा विविध विषयावंर चर्चा होत आहेत. 

काय करायचं हे मतदाराला माहिती असतं. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे आमचे मतदार आहेत. सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभादेखील जिंकू असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

महाराष्ट्र देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. या राज्याला गेल्या काही वर्षात मागे खेचलं गेलंय. राजकीय स्थैर्य आल्यावर इंडस्ट्री येतील, जातीय सलोख येईल, शेतकऱ्यांना फायदा होईल पण यासाठी राजकीय सलोखा असणे आवश्यक आहे.  

जी काम सुरु होती ती थांबवण्याचा प्रयत्न केल्याची टीका फडणवीसांनी केली होती. यावर आदित्य यांनी प्रतिक्रिया दिली. खोटं बोलण्यात फडणवीस खूप पुढे गेले आहेत. मेट्रो ३ च्या कामाला आम्ही थांबवलं नाही तर चालना दिली. पण आरे कारशेडचं काम थांबवल आणि कांजुरमार्गला नेलं. आरे कारशेडचं काम ६ महिन्यांच होतं. आम्ही कोविड काळातही मेट्रोचे काम थांबवले नव्हते. आता मेट्रो कामात भ्रष्टाचार झालाय, अशी टीका त्यांनी केली. 

जून २०२२ पासून जानेवारी २०२४ पर्यंत राहिलेल्या कामाला त्यांना २ वर्षे लागली. कोस्टल रोड पार्ट पार्टमध्ये सुरु झालाय. राष्ट्रीय महामार्गाची अवस्था पाहा. मुंबई-गोवा मुंबई-दिल्ली हायवे यांची दुर्दशा आहे. तरी गडकरी म्हणत असतात इतक्या कमी कालावधीत रस्ता केला. प्रत्येक अधिकाऱ्याने यातून पैसा काढल्याचे ते म्हणाले. 

लोकांच्या मनात फरत स्पष्ट आहे. काही ठिकाणी चिन्हामुळे थोडी गडबड झाली. पण महाराष्ट्राचा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर आहे. महाराष्ट्राने स्पष्ट निकाल दिलाय. 

कोणत्याही देशाच्या कोणत्याही नागरिकाने मला मत दिलं तर भाजपच्या पोटात का दुखतं? कोणाच्या माथ्यावर लिहिलेलं नसतं की तो कोणता मतदार आहे. बांगलादेशमध्ये हिंदुवर अत्याचार होतायत आणि वाद विवाद भारतात होतायत. त्याच बांगलादेशसोबत यांची बीसीसीआय त्यांच्यासोबत क्रिकेट खेळतेय. हीच गोष्ट काँग्रेसने केली असती तर भाजप आज रस्त्यावर उतरली असती. हिंदु, मुस्लिम, शीख, ईसाई, कोणीही आम्हाला मत देतील त्यांनी भारतीय म्हणून मत देतील, असे ते म्हणाले. 

आज मुंबईत साऱ्या धर्माची एकजूट सरकारला तोडायची आहे. धारावी आज लढतेय ती अदानींविरोधात लढतेय. धारावी आपल्या न्यायासाठी लढतेय. तिथे कोणता धर्म नाही. ही लढाई कमजोर करण्यासाठी सारे खेळ चालले आहेत. 

आपल्या देशाचा जो नागिरक असेल त्याला निवारा द्या, अन्न द्या हे आपलं हिंदुत्व आहे. भाजपचं हिंदुत्व नकली आहे. संविधान बदलण्याची भाषा भाजपकडून आली आहे. संविधानाप्रती त्यांचा द्वेश जाहीर आहे. हे नॅरेटीव्ह नव्हते. अच्छे दिन सारखी टॅग लाईन नाही. महाराष्ट्रात लोकशाही संपतेय. आमदार पळवून नेले. संविधानाने चालले असते तर आमदार बाद झाले असते. आमच्याबद्दल तुमच्या मनात राग असणे आवश्यक आहे. उद्धव ठाकरेंना संपवा असं म्हणतात, हा राग तुमच्याकडे कुठून आला? असा प्रश्न त्यांनी विचारला.  

लाडकी बहीण योजना गेमचेंजर?

सर्वात आधी या योजनेचं नाव, रंग ठरवा. भाजप आणि शिंदे जादूगार आहेत. सुरुवातील १५ लाख देणार बोलले आता १५०० वर आले. काही दिवसांनी १५ रुपये देण्यावर येतील, असे ते म्हणाले. लाडकी बहीण सोबत सुरक्षित बहिण योजना आम्ही आणू. सरकारचा दुटप्पीपणा आता समोर आला आहे. 

बलात्कार करणाऱ्याला दहशतवाद्यासारखी कलम लावायला हवीत.
ट्रस्टींवर वेगवेगळे आरोप झाले. कोणाला वाचवण्यासाठी मारलं गेलंय का? 

सारे इच्छुक उमेदवार मातोश्रीवर येत आहेत. घरी खूप गर्दी आहे. 

मला बनायचय असं म्हणत राहतो तो कधी मुख्यमंत्री बनत नाही.जो महाराष्ट्राला सक्षम बनवेल असा मुख्यमंत्री हवाय, असे ठाकरे म्हणाले.