मुंबई : नुकताच 12 वी रिझल्ट लागला. बारावीनंतर आता येत्या काही दिवसांमध्ये 10 वीच्या विद्यार्थ्यांचाही रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. दरम्यान 11 वी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी एव्हाना कोणतं क्षेत्र निवडायचं याबाबत निर्णय घेतला असेल. यासाठी तयारीही सुरु झाली असेल. मात्र यावेळी एडमिशनच्या कागदपत्रांची तयारी करण्यात अजिबात विसरू नका
आता 11 वी, इंजिनीयरिंग डिप्लोमा, पदवी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी काही महत्त्वाच्या प्रमाणपत्र गरजेची असतात. जाणून घेऊया ही कोणती प्रमाणपत्र आहे, जेणेकरून ऐनवेळी तुमची धावाधाव होणार नाही.
इंजिनीयरिंग अभ्यासक्रमांसाठी अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) नसलं तरी चालेल. त्याऐवजी 10 वी व 10 वी ची परीक्षा महाराष्ट्रातून दिली असल्याचा पुरावा. त्याचप्रमाणे जन्म महाराष्ट्रात झाल्याचा पुरावा चालतो. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी मात्र अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे.
आर्थिकदृष्टया मागासवर्गासाठी (ई.बी.सी.) फी माफीच्या योजना असतात. इंजिनीयरिंग अभ्यासक्रमांसाठी ट्युशन फी वेव्हर योजना, राजर्षी शाहू शिष्यवृती यासारख्या योजनांसाठी ही चालू वर्षीच्या उत्पन्नांचे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून घेणं आवश्यक आहे.