'दारुड्यांचं राज्य म्हणणाऱ्या भाजपमध्येच जास्त पियक्कड' नवाब मलिक यांचा टोला

नवाब मलिक यांच्या वक्तव्याने राज्यात नवा वाद उफाळण्याची शक्यता

Updated: Feb 2, 2022, 06:12 PM IST
'दारुड्यांचं राज्य म्हणणाऱ्या भाजपमध्येच जास्त पियक्कड' नवाब मलिक यांचा टोला title=

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. नवाब मलिक यांच्या वक्तव्यामुळे राज्यात नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. 

काय म्हणाले नवाब मलिक
मागच्या कॅबिनेट जी वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, त्यानिर्णयावर आज शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे अशी माहिती देताना नवाब मलिक यांनी हे दारुड्यांचं राज्य असं म्हणणाऱ्या भाजपमध्येच जास्त दारू पिणारी मंडळी आहेत, असं म्हटलं आहे. भाजप नेत्यांचे दारु निर्मितीचे कारखाने आहेत, त्याचे वाईन शॉप्स आहेत.. 

भाजपचे काही केंद्रीय मंत्री झाले आहेत त्यांचे बार आहेत. काही माजी मंत्र्यांचे बार आहेत, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. 

भाजपाचा दारुला इतका विरोध असेल,  तर भाजपवाल्याने हे सर्व परवाने सरेंडर केले पाहिजेत, भाजप नेत्यांनी शपथ घेतली पाहिजे की दारु पिणार नाही असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 

त्यांचे काही खासदार सांगतायत की थोडी थोडी पिया करो, सर्वात जास्त पिणारी जी मंडळी आहेत ती भाजपमध्येच आहेत. 

मध्यप्रदेश की 'मद्यप्रदेश'
मध्यप्रदेश हे मध्य प्रदेश राहिलेलं नाही, तो मद्यप्रदेश झाला आहे, तिथे तर होम बारची परवानगी देण्यात आलेली आहे. सर्वात कमी दारुची दुकानं ही महाराष्ट्रात आहेत. भाजप शासित प्रदेशात दारुच्या बाबतीत धोरणं आहेत. त्यामुळे या राज्यातील भाजपच्या नेत्यांनी शेजारच्या राज्यात जे मामाजी आहेत, त्याना भेटले पाहिजे, आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन भाष्य केलं पाहिजं, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.