अंबानी कुटुंबीय अँटीलियाच्या 27 व्या मजल्यावरच का राहतात? कारण अतिशय भन्नाट

भारतातील गडगंज श्रीमंत अंबानी कुटुंबीय 27 व्या मजल्यावरच का राहतात? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 8, 2024, 03:45 PM IST
अंबानी कुटुंबीय अँटीलियाच्या 27 व्या मजल्यावरच का राहतात? कारण अतिशय भन्नाट

भारतातील गडगंज श्रीमंत व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी. मुंबईतील अँटीलियामध्ये अंबानी कुटुंबीय राहतं. अँटीलिया हे जगभरातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. जे साऊथ मुंबईत वसलेले आहे.  4,00,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेलं हे 27 मजली घरं आहे. या घराची किंमत जवळपास 15 हजार कोटी रुपये इतके आहे. एवढं मोठं घर असलं तरीही अंबानी फक्त 27 व्या मजल्यावरच का राहतात? काय आहे या मजल्यावरचं वेगळेपण?

Add Zee News as a Preferred Source

मुकेश अंबानी, नीता अंबानी, त्यांची मुलं अनंत-आकाश, सूना श्लोका-राधिका आणि त्यांची नातवंडे वेदा आणि पृथ्वी देखील याच मजल्यावर राहतात.

 नीता अंबानी यांनी टॉप फ्लोअर 27 व्या मजल्यावर राहण्याचा निर्णय घेतला. याला मुख्य कारण म्हणजे मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश यामुळे घराला एक वेगळीच ऊर्जा मिळते. याव्यतिरिक्त, 27 वा मजला अंबानी कुटुंबियांचा अतिशय खाजगी मानला जातो, जिथे फक्त जवळचे कुटुंब आणि मित्र भेट देऊ शकतात.

अँटिलिया इतके भक्कम आहे की, 8.0 तीव्रतेच्या भूकंपाचा सामना करु शकते. एवढंच नव्हे तर या अँटीलियामध्ये 49 बेडरुम्स आहेत. हेल्थ स्पा, सलून, तीन स्विमिंग पूल, एक भव्य बॉलरूम, योग आणि डान्स स्टुडिओ आणि एक मोठा, मॅनिक्युअर हँगिंग गार्डन आहे. या एवढ्या मोठ्या घराला सांभाळण्यासाठी 600 हून अधिक लोक कार्यरत आहेत. 

अँटीलियाचे आर्किटेक्चर मास्टरपिस हे एका आयलंडचे नाव आहे. हे आर्किटेक्चर डिझाइन अतिशय पारंपरिक आहे. निसर्गातून प्रेरणा घेत अँटीलियाची निर्मिती झाली. तसेच लोटस आणि सूर्याची थिम असलेलं अँटीलिया आहे. अँटीलियाची निर्मिती ही अतिशय सुंदर अशा मार्बल आणि मदर ऑफ पर्लमधून झाली आहे. 

अँटीलियामध्ये तीन हेलीपॅड, 9 हाय स्पीड एलिव्हेटन, मल्टी स्टोरी पार्किंग या गोष्टींचा देखील समावेश आहे. अँटीलिया हे पारंपरिक आणि मॉडर्न आर्किटेक्चर असलेलं एक उत्तम उदाहरण आहे. अँटीलियामधून अंबानी कुटुंबाच गडगंज श्रीमंती आणि ऐश्वर्य दिसून येतं. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More