अनिल परब ED कार्यालयात हजर राहणार की नाही? वकिलांनी दिली ही माहिती

परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) नोटीस बजावली आहे.

Updated: Aug 31, 2021, 08:42 AM IST
अनिल परब ED कार्यालयात हजर राहणार की नाही? वकिलांनी दिली ही माहिती title=

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) नोटीस बजावली आहे. त्यांना मंगळवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. परंतु ईडीने बजावलेल्या नोटीसमध्ये नेमक्या कोणत्या प्रकरणाची चौकशी करायची आहे याचा स्पष्टं उल्लेख नाही.(Anil Parab)

ईडीने बजावलेल्या नोटीसीमध्ये नक्की कोणत्या प्रकरणाची चौकशी करणार याचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे अनिल परब हे स्वत: आज ED च्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार नाही.
 
अनिल परब यांच्या ऐवजी त्यांचे वकिल आज ED कार्यालयात हजर राहतील. ED ने बजावलेल्या नोटीस संदर्भात कोणती चौकशी होणार आहे. याची माहिती ED च्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात येईल. त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन पुढचा निर्णय घेणार आहेत.

भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेमुळे शिवसेना-भाजप यांच्यातील वाद चांगलाच टोकाला गेला. त्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना सक्तवसूली संचालयाने अर्थात ईडीने (Enforcement Directorate) नोटीस पाठवली होती. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत दिली होती. यामुळे आता या ईडीच्या नोटीसीमुळे पुन्हा एकदा दोन्ही पक्ष आमनेसामने येणार असल्याची चिन्हं आहेत.