'वायरल व्हिडिओ'च्या जमान्यात अस कराल तर तेच होईल जे याच्यासोबत झालं

महिलेला मारहाणा करणाऱ्या या व्यक्तीला दादरमध्ये अटक करण्यात आली. 

Updated: Apr 8, 2018, 08:55 AM IST
'वायरल व्हिडिओ'च्या जमान्यात अस कराल तर तेच होईल जे याच्यासोबत झालं  title=

मुंबई : चालत्या लोकलमध्ये गुरुवारी रात्री एक व्यक्ती महिलेला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ माध्यमांनी उचलून धरला. महिलेला मारहाणा करणाऱ्या या व्यक्तीला दादरमध्ये अटक करण्यात आली. ही घटना घडली तेव्हा महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचा जवानही तेथे होता. मात्र त्यानेही मदत केली नाही. पण आता या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर मारहाण आणि विनयंभगाचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय.  गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास विकलांगाच्या डब्ब्यात हा धक्कादायक प्रकार घडला. महिलेला वाचविण्याऐवजी व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीवर टीका करण्यात येत होती. पण व्हिडिओ काढणारी व्यक्ती विकलांग असल्याने काही करु शकत नसल्याचे समोर आलेय.

महिलेशी गैरवर्तन 

ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकलमधील दिव्यांगाच्या डब्यात एक व्यक्ती चढला आणि त्याने आधीपासूनच प्रवास करत असलेल्या महिलेशी गैरवर्तन कऱण्यास सुरुवात केली. कुर्ला आणि दादरदरम्यान या डब्यात एक व्यक्ती चढली आणि त्याने महिलेशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेल्यानुसार व्यक्ती सीटवर बसलेल्या महिलेला मारहाण करण्याचा प्रयत्न करतोय. त्या व्यक्तीच्या एक हातात बाटली आहे. नशेत असलेल्या या व्यक्तीने बाटलीतील पदार्थ त्या महिलेच्या अंगावर उडवण्याचाही प्रयत्न केला.

९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी 

 त्याने याची माहिती रेल्वे कंट्रोल रुमला दिली. आरोपी ३२ वर्षाचा असून लोकल दादरला पोहोचताच त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. दारूच्या नशेत त्याने पीडित महिलेचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. आरोपीवर आयपीसी कलम ३२३ (शारिरीक इजा पोहोचवण) आणि ३५४ (विनयंभग) च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ९ एप्रिलपर्यंत त्याला पोलीस कोठडीत पाठवण्यात आलयं.