मुंबईकरांना वडापाव पहिल्यांदा कोणी खायला घातला? कमाल म्हणावी 'या' माणसाची

 या प्रचंड प्रसिद्ध पदार्थाची सुरुवात कोणी केली माहितीये? माहित नसेल तर वडापाव खायच्या आधी हे वाचा म्हणजे तो खाण्याचा आनंद द्विगुणित होईल. 

Updated: Aug 24, 2022, 08:46 AM IST
मुंबईकरांना वडापाव पहिल्यांदा कोणी खायला घातला? कमाल म्हणावी 'या' माणसाची title=
World Vada Pav Day 2022 ashok vaidya invented mumbais favorite snack

World Vada Pav Day 2022 : 'तू दिल के दर्या की रानी....' असं म्हणत ज्या मुंबई शहराची ओळख करून दिली जाते, त्याच मुंबईशी काही गोष्टींची नाळ जोडली गेली आहे. या शहराची जादूच वेगळी. कोणासाठी हे शहर म्हणजे प्रेम, कोणासाठी त्याग, कोणासाठी पोशिंदा तर कोणासाठी हक्काचं ठिकाण. (Mumbai)

खिशात दहा रुपयांची नोट असलेल्यांपासून ते अगदी हजारो रुपये असणाऱ्यांना या शहरानं आसरा दिला आणि या शहरानं आसरा दिला तो म्हणजे अशा एका पदार्थाला, जो आपल्या आयुष्याचाच अविभाज्य भाग झाला आहे. 

हा पदार्थ म्हणजे वडापाव. मुंबई, मुंबईकर आणि वडापाव हे गणित नव्यानं सांगण्याची गरज नाही. म्हणजे तुमच्याइथे सर्वात उत्तम वडापाव कुठे मिळतो, असं विचारल्यास चौथी-पाचवीतली मुलंही चारपाच पर्याय देतील. 

अशा या प्रचंड प्रसिद्ध पदार्थाची सुरुवात कोणी केली माहितीये? माहित नसेल तर वडापाव खायच्या आधी हे वाचा म्हणजे तो खाण्याचा आनंद द्विगुणित होईल. 

World Vada Pav Day 2022 च्या निमित्तानं सध्या सोशल मीडियावर बरेच फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये एका नावाची बरीच चर्चाही होत असल्याचं दिसत आहे. हे नाव आहे अशोक वैद्य यांचं. याच व्यक्तिनं मुंबई शहराला वडापावची ओळख करुन दिली. 

थोडं भूतकाळात जाऊया... 
बऱ्याच ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार 1966 मध्ये अशोक वैद्य यांनी  मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाबाहेर वडापाव विकण्यास सुरुवात केली. त्यावेळी बेकरीतील पावाविषीय असणारं कुतूहल पाहून त्यांनी त्याला बटाटेवड्याची जोड दिली. 

अंड-पावच्या स्टॉलसमोरच त्यांनी वडापाव विकण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता या पदार्थानं जादूच केली. पाव, वडा, काही चटण्या एकत्र करून वैद्य यांनी ते विकण्यास सुरुवात केली. त्यावेळी दादरवरून मोठ्या प्रमाणात ये-जा करणाऱ्या मिल कामगारांच्या आवडीचं गे खाद्य. 

खिशाला परवडणारा, पोट भरणारा आणि जिभेचे चोचले पुरवणारा हा वडापाव बघता बघता सर्वसामान्य माणसाच्या आवडीचा पदार्थ झाला. वैद्य यांनी या वडापावच्या बळावर त्यांच्या कुटुंबाला आधार दिला. 

सचिन तेंडुलकरपासून बऱ्याच सेलिब्रिटींच्या आवडीचा हा वडापाव पार पदरेशापर्यंत जाऊन पोहोचला. अनेकांनी त्याचे फ्युजनही तयार केले. Common Man चा वडापाव मोठ्या हॉटेलांमध्ये Potato pattie spiced with turmaric and fresh green chilies covered with chickpea flour accompained with soft bun , अशा वर्णाने विकला जाऊ लागला. काळ पुढे गेला, वडापाव वयानं मोठा झाला, त्याच्या किमतीही वाढल्या पण, त्याचं स्थान मात्र कायमच अबाधित राहिलं. 

नाक्यावरच्या, गल्लीतल्या किंबहुना प्रत्येक वडापाव विक्रेत्यानं अशोक वैद्य यांना खऱ्या अर्थानं मुंबईतील प्रत्येक नागरिकापर्तंय पोहोचवलं असं म्हणणं गैर ठरणार नाही.