मुंबई : विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शनिवारी मुंबईतील बीकेसीत 14 मे ला झालेल्या सभेवरुन जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांची कालची सभा ही मास्टर नव्हे तर लाफ्टर सभा होती. मुख्यमंत्र्यांच्या सभेतून नवीन काहीच ऐकायला मिळालं नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये उत्तर भारतीय युवा मोर्च्याच्या सभेत ते बोलत होते. ( yesterday meeting of cm uddhav thackeray was not a master but a laughter meeting criticized by lop devendra fadnavis at goregaon)
"कालची सभा मास्टर नव्हे लाफ्टर सभा होती. या सभेतून तेजस्वी,ओजस्वी ऐकायला मिळेल असं वाटत होतं. पण नविन काहीच ऐकायला मिळालं नाही. 100 बापांची सभा बोलले होते. 100 कुणाकडे असतात, तर कौरवांकडे. काल कौरवांची सभा होती आणि आज पांडवांची सभा आहे", असं फडणवीस म्हणाले.
"महाशय मुख्यमंत्री दोन वर्षानंतर बोलले. अडीच वर्षात विकासावर एकही भाषण नाही", असंही विरोधी पक्षनेते म्हणाले.