१ डिसेंबरला १ करोड गॅस कनेक्शन बंद होणार, यात तुमचं नाव तर नाही ना?

आपल्या हातात आता काही दिवस राहिलेले आहेत. सरकार १ डिसेंबर रोजी जवळ जवळ १ कोटी गॅस कनेक्शन बंद करणार आहे.

Updated: Nov 16, 2018, 07:43 PM IST
१ डिसेंबरला १ करोड गॅस कनेक्शन बंद होणार, यात तुमचं नाव तर नाही ना? title=

मुंबई : आपल्या हातात आता काही दिवस राहिलेले आहेत. सरकार १ डिसेंबर रोजी जवळ जवळ १ कोटी गॅस कनेक्शन बंद करणार आहे. ज्या लोकांनी केवायसी म्हणजेच आधारकार्ड आणि पॅनकार्डची माहिती दिली नाही, त्यांचा यात समावेश होणार आहे. केंद्र सरकारने भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडियन गॅस या कंपन्यावा केवायसी पूर्ण करण्यास सांगितले आहे. यासाठी या कंपन्यांना ३० नोव्हेंबरची शेवटची मुदत असेल.

आता देखील अनेक गॅस वापरणारे आहेत, ज्यांनी अजून देखील केवायसी दिली नाही. सरकार करणार त्यांचं गॅस कनेक्शन बंद करणार आहे.

मीडिया वृत्तानुसार, केंद्र सरकारने गॅस एजन्सीकडून केवायसी अंतर्गत, आधारकार्ड नंबर जमा न करणारे आणि 'गिव इट अप' स्किमसाठी लोकांची माहिती मागितली आहे. 

सरकारने तीन वर्षापूर्वीच गॅस कनेक्शनला बॅंक खात्यासोबत जोडण्याची योजना सुरू केली होती. यामुळे सब्सिडीचा लाभ सरळ ग्राहकांना मिळणार आहे. ३ वर्ष होऊनही खूप लोकांनी केवायसी अपडेट केलेले नाही. ज्यांचं वार्षिक इनकम १० लाखांपेक्षा जास्त आहे, ते देखील सब्सिडीचा लाभ घेत आहेत.

सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळजवळ १ कोटी गॅस ग्राहकांनी अजूनही आपलं केवायसी अपडेट केलेलं नाही. यात सर्वात जास्त दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील लोकांचा समावेश आहे.