close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंबई विमानतळाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत तरुणाची आत्महत्या

 ही चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्या तरुणाचे नातेवाईक मुंबईला पोहचले आहेत.

Updated: May 12, 2019, 10:29 AM IST
मुंबई विमानतळाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत तरुणाची आत्महत्या

मुंबई : 31 वर्षाच्या तरुणाने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली आहे. शनिवारची ही घटना असून अक्षय सारस्वत असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण उत्तर प्रदेशातून आला होता आणि त्यावर मानसिक ताण होता म्हणूनच त्याने विमानतळावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अक्षयचे मित्र आणि नातेवाईक यांच्याकडे तपास करत आहेत. 

आपल्या मृत्यूला कुणास जबाबदार धरू नये असे त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. ही चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्या तरुणाचे नातेवाईक मुंबईला पोहचले आहेत. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचा सर्व प्रकार विमानतळावरील काही प्रवाशांनी चित्रित केला आहे. हा तरुण इमारतीवर बराच वेळ लटकत होता मात्र त्यास वाचवण्यास कोणी पुढे येत नसल्याचे या चित्रीकरणातून दिसत आहे.