पूनम पांडेने अखेर कपडे उतरवले

मॉडेल पूनम पांडे ही नेहमी प्रसिद्धीच्या झोतात या ना त्या कारणाने असते. शाहरूख खानच्या टीमसाठी पूनम पांडेने कपडे उतरवले. ती एवढ्यावच न थांबता तिने नग्न छायाचित्र ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे.

Updated: May 29, 2012, 10:33 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मॉडेल पूनम पांडे ही नेहमी प्रसिद्धीच्या झोतात या ना त्या कारणाने असते. शाहरूख  खानच्या टीमसाठी पूनम पांडेने कपडे उतरवले. ती एवढ्यावच  न थांबता तिने नग्न छायाचित्र ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे.

 

पूनम पांडेचे ट्विटरवर हे नग्नावस्थेतील छायाचित्र प्रसिद्ध होताच त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडायलाच सुरुवात झाली. एकाने तर पूनम पांडेमुळेच भारत विश्वचषक आणि कोलकात्याचा संघ आयपीएल जिंकल्याचा दावा केला. पूनमनेही या प्रतिक्रियांमुळे आपली जगभर चर्चा सुरू झाल्याची स्वतःवरच स्तुतिसुमने उधळली. वर हा तर ट्रेलर आहे, सिनेमा अजून बाकी आहे, तेव्हा पाहत रहा, असे तिने ट्विट केले आहे.

 

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या विजयानंतर कपडे उतरविण्याचा संकल्प केला होता. तो पूनम पांडेला पाळता आला नसला तरी तिने आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेतील कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयानंतर न्यूड होऊन हा विजय साजरा केला आहे.

 

शाहरुखच्या कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल स्पर्धा जिंकली की नग्न होण्याचे पूनमने घोषीत केले होते. त्यानुसार तिने आपले कपडे उतरवून तसे छायाचित्र ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे. वर 'वचन दिल्याप्रमाणे हे छायाचित्र' अशी टीपही जोडली आहे. तसेत नग्न छायाचित्र प्रसिद्ध करत असतानाच, त्याकडे १८ वर्षाखालील व्यक्तींनी पाहू नये, असा सल्ला दिला आहे. आणि हे छायाचित्र कोणी पाहिल्यास त्याला आपण जबाबदार नाही, अशी मल्लिनाथीही केली आहे.