बिग बी अमिताभ चुकतात तेव्हा...

हिंदी चित्रपटसृष्टीतील बडे स्टार चुकतात आणि त्यांच्या चुका त्यांचे चाहते काढतात. अशीच घटना घडली आहे, तीही लंडन ऑलिम्पिकच्या निमित्ताने. चुकले कोण, असा प्रश्न पडला ना. बिग बी अमिताभ बच्चन आणि स्टार शाहीद कपूर. बिग बीन मेरी कोमला आसामची करून टाकली तर शाहीदने मेरीचे कॉम केले. त्यामुळे हे दोघे ‘ट्विटर'वर चुकांमध्ये हीट झाले.

Updated: Aug 8, 2012, 09:34 PM IST

www.24taas.com , नवी दिल्ली

 

हिंदी चित्रपटसृष्टीतील बडे स्टार चुकतात आणि त्यांच्या चुका त्यांचे चाहते काढतात. अशीच घटना घडली आहे, तीही लंडन ऑलिम्पिकच्या निमित्ताने. चुकले कोण, असा प्रश्न पडला ना. बिग बी अमिताभ बच्चन आणि स्टार शाहीद कपूर. बिग बीन मेरी कोमला आसामची करून टाकली तर शाहीदने मेरीचे कॉम केले. त्यामुळे हे दोघे ‘ट्विटर'वर चुकांमध्ये हीट झाले.

 

सध्या जगभरात ‘ऑलिंपिक फिव्हर' आहे. वेळात वेळ काढून अनेक जण ‘लाइव्ह अपडेट्‌स'ही देत आहेत; पण लंडन ऑलिंपिकविषयी सर्वांत जास्त चर्चा करणारे अमिताभ बच्चन आणि शाहीद कपूर यांच्या ‘टायपिंग'मध्ये मात्र खेळाडूंचे राज्य आणि नावही बदलली आहेत.

 
मेरी कोमने पदक निश्‍चित केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ‘ट्‌विट' केले, "मेरी कोमने हा सामना जिंकून किमान ब्रॉंझपदक निश्‍चित केले. कमाल! आसाममधील या दोन मुलांच्या आईने देशाची मान उंचावली आहे !, पण मेरी कोम ही आसामची नसून मणिपूरची आहे, हे अनेकांनी "बिग बी'च्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर त्यांनी चूक दुरूस्त केली. तसेच अमिताभ यांनी विजेंदर सिंगचा उल्लेख ‘विजेंद्र' असा केला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी पुन्हा विजेंदरच्या ‘स्पेलिंग'मध्ये बदलही केला.

 
मेरी कोमच्या नावातच चूक करणारा शाहीद कपूर सोमवारी दिवसभर ‘हॉट ट्रेंड्‌स'मध्ये होता. शाहीदला त्याच्या चाहत्यांनी त्याची चूक सांगितली. त्यानंतर ‘मेरी जिंकली हे महत्त्वाचे आहे, ‘टायपिंग'मधील चूक नाही !' असे शाहीदने सांगितले. तरीही, हे "ट्विट' करतानाही शाहीदने पुन्हा तिच्या नावात चूक केली.