www.24taas.com,पुणे
मराठी मनावर कित्येक दशक अधिराज्य गाजवणार नाव म्हणजे व्यंकटेश माडगुळकर... मराठी कथेचे परिवर्तकार , अशी ओळख असणा-या साहित्य विश्वातल्या या दमदार लेखकाची पुस्तक पुन्हा एकदा मराठी मनाचा ठाव घेण्यासाठी येत आहेत. येत्या १८ तारखेला एकाच वेळी ही पुस्तकं प्रकाशित केली जाणारेत... या ४१ पुस्तकांच्या संचाची किंमत ५,१९५ रुपये एवढी असणारेय... माडगूळकरांच्या नव्या रुपातल्या या पुस्तकांचं प्रकाशन ज्येष्ठ लेखक द.मा. मिरासदार यांच्या हस्ते होणार आहे.
माणदेशी माणसं, सत्तांतर, वावटळ, नागझिरा अशी एका हून एक सरस पुस्तकं मराठी वाचकांना देणारे व्यंकटेश माडगूळकर.. गेली कित्येक वर्ष माडगुळकरांचं हे साहित्य मराठी मनांवर गारुड घालतंय.. पण त्यांची अनेक पुस्तकं सध्या वाचकांना उपलब्ध होत नव्हती... नेमकी हीच अडचण लक्षात घेवून मेहता पब्लीशिंग हाऊसन त्यांची तब्बल ४१ पुस्तक नव्या आणि आकर्षक पद्धतीनं वाचकांच्या भेटीला आणली आहेत.
ही पुस्तकं जरी नव्या स्वरूपात येत असली तरी मूळ कलाकृतीला कसलीही बाधा येणार नाही याची काळजी घेण्यात आलीय.. ज्या पुस्तकांच्या मुखपृष्टांसाठी माडगुळकरांनी रेखाटंन केलीयेत ती ही बदलण्यात आलेली नाहीत. पण तात्यांची प्रतिमा वाचकांच्या मनात ठसावी यासाठी मुखपृष्टावर त्यांच छायाचित्र असणार आहे.. अर्थात हे बदल जुन्या झाडाला पालवी फुटावी असेच आहेत.