www.24taas.com, मुंबई
ज्येष्ठ अभिनेते दारासिंग यांची प्रकृती नाजूक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. त्यांच्या रक्तात ऑक्सिजनची पातळी खालावली आहे. गेल्या ३६ तासांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.
शनिवारी संध्याकाळीच प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आलेत..CIPD या आजाराने ते त्रस्त आहेत.
ज्येष्ठ अभिनेते दारासिंग यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अंधेरीच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शनिवारी संध्याकाळीच प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
त्यांना हृदयरोग आहे. दारा सिंग यांचं वय ८३ वर्षं आहे. दारा सिंग यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती त्यांचा पुत्र विंधू दारा सिंग याने दिली.दारा सिंग यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ निर्माण झाली आहे. तसंच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती विंधूने दिली.