'कोलावेरी डी'ची पाच कोटींची भरारी!

कोलावेरी डीने सोमवारी युट्युबवर ५० दशलक्ष हिट्सचा टप्पा ओलांडला आहे. धनुषच्या या अनोख्या गाण्याची क्रेझ आणि अपील अजूनही कायम असल्याचं त्यामुळे सिद्ध होतं. सोमवार संध्याकाळपर्यंत ५०,०८६,६३३ हिटसची नोंद झाली आहे. कोलावेरी डी इंटरनेटवर १६ नोव्हेंबर रोजी लँच करण्यात आलं होतं आणि एका दिवसात दहा लाख हिट्सचा विक्रम या गाण्याने नोंदवला.

Updated: Mar 26, 2012, 05:28 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

कोलावेरी डीने सोमवारी युट्युबवर ५० दशलक्ष हिट्सचा टप्पा ओलांडला आहे. धनुषच्या या अनोख्या गाण्याची क्रेझ आणि अपील अजूनही कायम असल्याचं त्यामुळे सिद्ध होतं. सोमवार संध्याकाळपर्यंत ५०,०८६,६३३ हिटसची नोंद झाली आहे. कोलावेरी डी इंटरनेटवर १६ नोव्हेंबर रोजी लँच करण्यात आलं होतं आणि एका दिवसात दहा लाख हिट्सचा विक्रम या गाण्याने नोंदवला.

कोलावेरी डीची वेगळी शब्दकळा, हटके धून यामुळे तिने तरुणाईला अक्षरश: वेडं करुन सोडलं. धनुष तमिळ सुपरस्टार रजनीकांतच्या जावऊ असून त्यानेच हे गाणं तमिळ आणि इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. अनिरुध रवीचंदर या २१ वर्षीय संगीतकाराने धनुषच्या आगामी ३ या सिनेमासाठी ते संगीतबद्ध केलं आहे. धनुषची पत्नी ऐशवर्या रजनीकांत या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.

धनुषने सचिन तेंडुलकरवर गाणं संगीतबद्ध केलं आहे. कोलावेरी डीच्या लोकप्रियतेने विक्रमाच्या नव्या उच्चांकाची नोंद केली आहे. कोलावेरी डीच्या लोकप्रियतेमुळे या गाण्याची नक्कल करणारी अनेक भाषेत गाणी तयार करण्यात आली आहेत.