बोनी कपूरची माजी पत्नी मोना यांचे निधन

निर्माते बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर यांचे निधन झालं. मोना कपूर यांना पंधरा दिवसांपूर्वीच कर्करोग झाल्याचं निदान करण्यात आलं होतं. गेली पाच महिने मोना कपूर आजारी होत्या, जानेवारी महिन्यात त्यांची प्रकृती ढासळली. बोनी कपूर हे अनिल कपूर यांचे मोठे भाऊ आहेत. मोना कपूर यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी श्रीदेवीशी विवाह केला.

Updated: Mar 25, 2012, 09:34 PM IST

www.24taas.com, मुंबई

निर्माते बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर यांचे निधन झालं. मोना कपूर यांना पंधरा दिवसांपूर्वीच कर्करोग झाल्याचं निदान करण्यात आलं होतं. गेली पाच महिने मोना कपूर आजारी होत्या, जानेवारी महिन्यात त्यांची प्रकृती ढासळली. बोनी कपूर हे अनिल कपूर यांचे मोठे भाऊ आहेत. मोना कपूर यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी श्रीदेवीशी विवाह केला.

मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. बोनी कपूर आणि मोना कपूर यांना अर्जून आणि अन्शुला अशी दोन मुलं आहेत. अर्जून बॉलिवूडमध्ये इश्कजादे या सिनेमाद्वारे पदार्पण करत आहे. अर्जूनला आईच्या आजारपणाबद्दल कळल्यानंतर त्याने अतिशय धीरोदात्तपणे परिस्थितीचा सामना केला. मोना कपूर आपल्या मुलाच्या पदार्पणामुळे उत्साहित होत्या. त्यांनी अर्जूनच्या सिनेमाचे पोस्टर पोस्ट केलं होतं. मोना कपूर यांनी ट्विट करताना म्हटलं होतं की फटा पोस्टर निकले हिरो और हिरॉईन. अर्जून कपूर आणइ परिनिती चोप्रांचा ब्रँड न्यु सिनेमाचे पोस्टर इश्कजादे. दुर्दैवाने सिनेमा प्रदर्शित होण्या अगोदर मोना कपूर यांचे निधन झालं आहे. मोना कपूर यांनी आजाराशी धीराने सामना केला.

गायिका सोफी चौधरीने ट्विटरवर मोना कपूर यांच्या निधनाची बातमी ब्रेक केली. मला धक्का बसला आहे असं सोफीने ट्विट केलं आहे. तसंच देव अर्जून आणि अन्शुलाला या समयी दु:खाचा सामना करण्याची तादक देवो असंही ट्विट तिने केलं आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी ट्विटरवर शोकसंदेश ट्विट केले आहेत. राज कुंद्राने माझ्या अतिशय जवळची मैत्रिण गमावल्याचं दुख व्यक्त करताना एक अतिशय प्रेमळ आणि काळजी घेणारं व्यक्तीमत्व आपल्यातून गेल्याचं म्हटलं आहे.