www.24taas.com, मुंबई
अभिनेत्री विद्या बालनचा गाजलेला डर्टी पिक्चर हा सिनेमा टीव्हीवर दाखवण्यास हायकोर्टानं संमती दिलीय. मात्र पिक्चरमधील 56 सीन्स वगळून हा पिक्चर दाखवण्यात यावा असंही म्हटलंय.
मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं ही परवानगी दिली आहे. 22 एप्रिल रोजी एका खाजगी दूरचित्रवाहिनीवर हा पिक्चर दाखवण्यात येणाराय. आक्षेपार्ह आढळल्यास सेन्सॉर बोर्डाकडून कारवाई करण्यात येणार आहे.
यापूर्वी जेव्हा द डर्टी पिक्चर जगभरात प्रदर्शित झाला होता, तेव्हा पाकिस्तानात प्रदर्शनास द डर्टी पिक्चर योग्य नसल्याचं सांगत तिथल्या सेन्सर बोर्डाने बंदी घातली होती. खुद्द विद्या बालननेही हा सिनेमा फक्त प्रौढांसाठीच असून १८ वर्षांखालील मुलांनी हा सिनेमा पाहू नये असं म्हणाली होती.