पूनम पांडेची सनी लिऑनवर शेरेबाजी

एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सनी लिऑनला टार्गेट करत पूनम म्हणाली, “मला कळत नाही, लोक सनीबद्दल का एवढे उत्सुक आहेत. ती जे करते, तसं मी कधीच करणार नाही.

Updated: Apr 20, 2012, 04:14 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

गेलं वर्षभर पूनम पांडेकडे ना कुठली फिल्म होती, ना कुठल्या मोठ्या ब्रँडची जाहिरात, न रँपवर फारशी ती गाजली होती. थोडक्यात कुठलंच काम नसूनही केवळ आपल्या वादग्रस्त विधानांनी आणि अंगप्रदर्शनाने पूनमने इंटरनेटवर गहजब उडवून दिला. भारतीय क्रिकेट टीमसाठी कपड्यांना तिलांजली देण्याची भाषा करणाऱ्या पूनम पांडेला अखेर एक सिनेमा मिळाला आहे. ‘जिस्म’ चा दिग्दर्शक अमित त्रिवेदी याच्या आगामी सिनेमात काम मिळालं आहे. पण, सिनेमा मिळायचा अवकाश, पूनमने आपल्या अभिनयक्षमतेवर आधीपासून बाता मारायला सुरूवात केल्या आहेत.

 

याशिवाय एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सनी लिऑनला टार्गेट करत पूनम म्हणाली, “मला कळत नाही, लोक सनीबद्दल का एवढे उत्सुक आहेत. ती जे करते, तसं मी कधीच करणार नाही. किती ‘दाखवायचं’ आणि किती ‘झाकायचं’, हे मला चांगलंच कळतं.” एढंच नव्हे, तर पूनमने बिपाशावरही शेरेबाजी करायला मागे पुढे पाहिलं नाही. मी ‘जिस्म’मध्ये बिपाशाच्या जागी असते, तर तिच्याहून खूप चांगला अभिनय केला असता. मी त्या भूमिकेला आणखी वेगळ्या पातळीवर घेऊन गेले असते.”

 

पूनम आपल्या भूमिकेला कुणल्या पातळीवर घेऊन गेली असती, ते माहित नाही. पण, आता सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या सनी, पूनमसारख्या अभिनेत्रींमुळे सिनेमा कुठल्या पातळीवर जाईल; हे कोण सांगणार?