www.24taas.com, मुंबई
बॉलीवूडच्या एखाद्या दिग्गजाचा वाढदिवस सामान्यांसाठी मात्र डोकेदुखी ठरते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. निमित्त होतं निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेता फरहान अख्तर याच्या वाढदिवसाच्या पार्टीचं. बांद्र्याच्या फरहानच्या घरी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती.
बॉलीवूडच्या अनेक तारे तारकांनी या पार्टीला हजेरी लावली होती. किंग खान शाहरुख खानपासून ते हृतिक रोशन, कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा, रणदीप हुडा असे अनेक सेलिब्रेटी या पार्टीला हजर होते. ही पार्टी रात्री उशिरा पर्यंत म्हणजे मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत चालली, तरीही पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.
मात्र मीडियाला पाहून थोडीफार हालचाल करत डीजे बंद करायला लावला, मात्र कोणताही दंड आकारला नाही. या पार्टीसाठी मीडियाप्रमाणेच बॉलीवूड चाहत्यांची रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा आणि आवाजाचा स्थानिकांना त्रास सहन करावा लागला.