बिग बी उपचारासाठी अमेरिकेला जाणार?

हिंदी चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन सध्या आजारपणाच्या वेगळ्याच वळणावर आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती जरा नरम-गरम दिसते आहे. नुकतेच त्यांनी सिटी स्कॅन केल्यानंतर आता ते अधिक उपचारांसाठी अमेरिकेला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Updated: May 2, 2012, 07:41 PM IST

www.24taas.com, मुंबई

हिंदी चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन सध्या आजारपणाच्या वेगळ्याच वळणावर आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती जरा नरम-गरम दिसते आहे. नुकतेच त्यांनी सिटी स्कॅन केल्यानंतर आता ते अधिक उपचारांसाठी अमेरिकेला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार बिग बी यांनी सप्टेंबरपर्यंत कोणतेही नवीन काम हातात घेतले नाही. फेब्रुवारीमध्ये झालेल्या ऑपरेशननंतर बिग बी यांना पहिल्यांदा खूप वेदना होत आहे. त्यामुळे त्यांनी नुकतेच सिटी स्कॅन केले असल्याचे बिग बींच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

मे-जून महिन्यात ते लॉस एंजेल्सला जाणार असून त्या ठिकाणी ते काही टेस्ट करणार आहेत. तसेच गरज पडल्यास ते उपचारही घेणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी सप्टेंबरपर्यंत कोणतेही नवीन काम हातात घेतले नाही.

दरम्यान, बिग बी हे सप्टेंबरपूर्वी रोहित शेट्टीच्या ‘बोलबच्चन’ या चित्रपटाची शुटींग करणार आहे. या चित्रपटात बिग बींचा सुपूत्र अभिषेक बच्चन आणि अजय देवगण काम करणार आहे. दुखणं असताना केवळ मुलगा काम करीत आहे आणि चांगली भूमिका असल्यामुळे त्यांनी हे काम करण्याचे निश्चित केले असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

महानायकाचे अनेक चित्रपट सध्या प्रदर्शित व्हायचे आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती लवकर बरी होवो ही ईश्वरा चरणी सदिच्छा!