बिपाशाला अजून कोणी 'पुरूष' भेटला नाही- पूनम पांडे

हॉट मॉ़डेल पूनम पांडे आणि बॉलिवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बासू यांच्यात आता चांगलीच जुंपली आहे. बिपाशा बासूने नुकेतच एक वक्तव्य केलं होतं की, पुरूष हे हरणारे असतात. ते लूजर्स आहेत.

Updated: Jul 13, 2012, 07:09 PM IST

www.24taas.com,  मुंबई

 

हॉट मॉ़डेल पूनम पांडे आणि बॉलिवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बासू यांच्यात आता चांगलीच जुंपली आहे. बिपाशा बासूने नुकेतच एक वक्तव्य केलं होतं की, पुरूष हे हरणारे असतात. ते लूजर्स आहेत. अशी टीकाटीप्पणी बिपाशाने पुरूषांविरोधात केली आहे. त्यानंतर पूनम पांडे मात्र चांगलीच बिथरली आणि मात्र त्यानंतर तिने बिपाशावर जो काही हल्लाबोल केला.

 

तो अगदीच अनपेक्षित असा होता. पूनमने पुरूषांची बाजू घेत बिपाशाला चांगलेच सुनावले आहे. 'बिपाशाला आजवर कोणी पुरूष मिळाला नसेल'. त्यामुळे बिकनी क्वीन पूनम पांडेने बिपाशालाच लूजर्स ठरविले आहे. बिपाशा आपल्या करीअरपासून असंतुष्ट आहे. पूनमने बिपाशावर अक्षरश: तोफ डागली आहे. 'बिपाशा जर आजचे पुरूष हे लूजर्स आहेत तर तू कोणत्या म्हाताऱ्या श्रीमंत व्यक्तीसोबत राहणार आहेस?'

 

पूनमने ट्विटरवर आपलं मत माडलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून बिपाशा काहीही चांगलं करू शकलेली नाही. आणि त्यामुळे ती लूजर आहे अशी टीका पूनमने केली आहे. त्यामुळे पूनमने पुरूषांची बाजू घेऊन बिपाशाला चांगलेच सुनावले आहे. तर पूनमने पुरूषांची बाजू घेऊन त्यांना आपल्याकडेही वळविले आहे. पूनमच्या या कृतीचा मात्र तिला चांगलाच फायदा होणार आहे. कारण बरेच पुरूष तिच्यावर खूश होतील अशी तिला आशा आहे.