येतोय... एक दबंग ‘टायगर’

दबंग सलमान खान आता ‘टायगर’च्या रुपात त्याच्या चाहत्यांना भेटायला येतोय. नुकताच त्याच्या आगामी चित्रपट ‘एक था टायगर’ चा प्रोमो ऑनलाईन आला आहे.

Updated: May 11, 2012, 02:45 PM IST

 

www.24taas.com, मुंबई

दबंग सलमान खान आता ‘टायगर’च्या रुपात त्याच्या चाहत्यांना भेटायला येतोय. नुकताच त्याच्या आगामी चित्रपट ‘एक था टायगर’चा प्रोमो ऑनलाईन आला आहे. निर्देशक कबीर खानच्या या चित्रपटात सलमान खान पुन्हा एकदा कतरिना कैफ बरोबर दिसणार आहे. आदित्य चोपडा या चित्रपटाचा प्रोड्युसर आहे.

 

या प्रोमोनंतर कबीर खाननं ट्विटरवर प्रेक्षकांचे आभार मानलेत. तो म्हणतो, "तुमच्या शानदार रिस्पाँससाठी मी तुमचा आभारी आहे. ‘एक था टायगर’च्या फोटोवर हजारो ट्विट आले आहेत. पण त्या सगळ्यांना उत्तर देणं मात्र कठिण आहे." ‘यू ट्युब’वर या सिनेमाचा प्रोमो पाहण्यासाठी तर लोकांनी अक्षरश: उड्या मारल्या. काही वेळातच हा प्रोमो पाहणाऱ्यांची संख्या लाखोंवर पोहोचली होती. कबीर म्हणतो, "तीन मिनिटांच्या आत सर्व्हर तर हँग होणार नाही ना? अशी भीती मला वाटत होती. प्रोमो लॉन्च झाल्यानंतर केवळ तीन मिनिटांत तो हिट झाला होता."

 

यश चोपडा बॅनरखाली या चित्रपटाचं काम अजूनही सुरू आहे. भारत-पाकिस्तानच्या संबंधांवर आधारित या चित्रपटात आपल्याला चकित करणाऱ्या हिंसक दृश्यांचाही समावेश आहे.