रितेशच्या लग्नाचा शाही थाट...

रितेश देशमुख आणि जेनेलिय़ा डिसुझा हे बॉलिवूड कपलच्या लग्नाचा स्वागत समारंभ थाटामाटात पार पडला. या शाही स्वागत समारंभाला अमिताभ बच्चन आपल्या परिवारासह या स्वागत समारंभाला हजर होते. तसंच अवघं बॉलिवूडही या स्वागत समारंभाला अवतरलं होतं.

Updated: Feb 5, 2012, 10:14 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

रितेश देशमुख आणि जेनेलिय़ा डिसुझा हे बॉलिवूड कपलच्या लग्नाचा स्वागत समारंभ थाटामाटात पार पडला. या शाही स्वागत समारंभाला अमिताभ बच्चन आपल्या परिवारासह या स्वागत समारंभाला हजर होते. तसंच अवघं बॉलिवूडही या स्वागत समारंभाला अवतरलं होतं.

 

रितेश देशमुख आणि जेनेलिय़ा डिसुझा हे बॉलिवूडच्या कपलच्या लग्नाचा स्वागत समारंभ थाटामाटात पार पडला. शुक्रवारी बॉलिवूडमधील हे क्युट कपल विवाहबद्ध झालं. शनिवारी या शाही स्वागत समारंभाला बॉलिवूडचं अवघं तारांगण अवतरलं. अमिताभ बच्चन आपल्या परिवारासह समारंभाला हजर होते तर माधुरीच्या खास एपिअरन्सने कार्यक्रमाची शान आणखीनच वाढवली.

 

तर सैफिना अर्थात सैफ-करिनाने येऊन चार चाँद लावले. आमीर आणि इम्रान ही मामा-भाचा जोडी आवर्जून उपस्थित होती. रेखा श्रीदेवी जुही चावलादेखील ट्रॅडिशनल पेहरावात दिसल्या. बॉलिवूडचे अनेक सितारे रितेश-जेनेलियाच्या या आनंदात सहभागी झाले. त्यामुळे बॉलिवूड आणि राजकारण्यांच्या उपस्थितीत या बिग फॅट वेडिंगचा स्वागत समारंभदेखील बिग झाला हे मात्र नक्की.