शाहरूखला मिरच्या का झोंबल्या?

शाहरुख खान को गुस्सा क्यों आता है. हा प्रश्न फिल्मफेअरच्या प्री बॅश पार्टीत सगळ्याच पत्रकारांना पडला. कारण एका साध्या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुखनं चक्क उद्धटपणे उत्तर दिलं ते असं. प्रश्न असा होता की कतरिनासह पहिल्यांदा काम करताना शाहरुखला कसं वाटतंय..?

Updated: Jan 18, 2012, 09:00 PM IST

www.24taas.com

 

शाहरुख खान को गुस्सा क्यों आता है. हा प्रश्न फिल्मफेअरच्या प्री बॅश पार्टीत सगळ्याच पत्रकारांना पडला. कारण एका साध्या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुखनं चक्क उद्धटपणे उत्तर दिलं ते असं. प्रश्न असा होता की कतरिनासह पहिल्यांदा काम करताना शाहरुखला कसं वाटतंय..? मात्र या प्रश्नावर शाहरुखनं  मी यशराज फिल्मसह काम करणार आहे ज्यात कतरिना आणि अनुष्काही आहेत असं उत्तर देत मुद्दामून कतरिनाचा प्रश्न टाळला. शिवाय पुढे शाहरुखला चिकनी चमेली गाण्यावर प्रतिक्रिया विचारल्यावर मी हे गाणं पाहिलेलं नाही असं धादांत खोटंही शाहरुख बोलला.

 

आता किंग खानला कतरिनाचं नाव घेतल्यावर इतक्या मिरच्या का झोंबल्या ?  याचं उत्तर उपस्थितांना मिळालं नाही. मात्र त्याच्या बाबत फक्त अंदाजच बांधता आले आहेत. ते म्हणजे कतरिना आणि शाहरुख एकाच सिनेमात काम करणार असले तरीही सलमानशी  कतरिनाच्या पार्टीत  झालेलं भांडण शाहरुख अजून विसरलेला नाही. शिवाय कतरिना बद्दल काहीही बोलला तरी दबंग सलमान ते खपवून घेणार नाही, कारण कतरिना आजही सलमानची जवळची मैत्रीण आहे याची कल्पना शाहरुखला आहे. त्यामुळेच शाहरुखनं कतरिनाचा उल्लेख टाळला असल्याचा अंदाज आहे.

 

मात्र शाहरुखच्या अशा उद्धटपणे बोलण्यानं नक्कीच किंग खान आणि कतरिनात काहीतरी बिनसलं आहे हे तर स्पष्टच आहे. क्षणात मैत्री क्षणात वैर हा तर बॉलिवूडचा धर्मच आहे. त्यामुळे सध्या टँट्रम्स दाखवणाऱ्या शाहरुख कतरिनासह सिनेमाच शूट सुरु झालं. नंतर तिचे गोडवे गायले तर तुम्हा आम्हाला मुळीच आश्चर्य वाटणार नाही.