पांडेंची पूनम चाँद पौर्णिमेचा की अमावस्येचा!

एकेकाळी कँलेडरवर तोकड्या कपडयात आपल्या देहाच्या भांडवलाचा वापर करणाऱ्या पूनम पांडेचं नशीब फळफळलं आहे राव...

Updated: Jan 18, 2012, 08:45 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

एकेकाळी कँलेडरवर तोकड्या कपडयात आपल्या देहाच्या भांडवलाचा वापर करणाऱ्या पूनम पांडेचं नशीब फळफळलं आहे राव... टीम इंडियाने २०११ चा वर्ल्ड कप जिंकला तर तिने स्वत:ची कापडं स्वत:चं फेडेन असं जाहीर आश्वासन दिलं होतं. आता पूनम ते पाळलं नसलं तरी त्यामुळे तिला जी काही प्रसिद्धी मिळाली त्याचा फायदा तिच्या पदरात पडला आहे. बॉलिवूडमधल्या एका आघाडीच्या प्रॉडक्शन हाऊसच्या चकरा सध्या पूनम मारते आहे आणि लवकरच ती मोठा सिनेमा साईन करेल अशी चिन्हं आहेत.

 

पूनमने त्याचा इनकार केला नसला तरी त्याबाबत ती अधिक काही सांगू इच्छित नाहीये. लवकरच पूनम आघाडीच्या भूमिकेत चमकेल. अश्मित पटेल आणि राहुल महाजन यांच्या सोबत तिला भूमिकांच्या ऑफर्स होत्या. पण पूनमने त्याला सपशेल नकार दिला. एकाअर्थाने ते बरचं झालं सगळे नंगट असल्यावर नंगा नाचच व्हायचा.

 

आता पूनमचं त्यावर म्हणणं आहे की तिला फक्त ए ग्रेड स्टार्स सोबत काम करायचं आहे. बर तिला दक्षिणेत भरपूर ऑफर्स आल्या होत्या, पण त्याही तिने नाकारल्या. पूनमच्या या भन्नाट आत्मविश्वासाला मात्र आपल्याला दाद द्यावीच लागेल. आपल्या अंगी कोणतीही गुणवत्ता आणि कौशल्य नसताना केवळ कपडे उतरवण्याच्या धाडसावर एकाद्या व्यक्तीने किती मजल मारावी ही थक्क करुन सोडणारी बाब आहे.

 

आता तिला आघाडीच्या प्रॉडक्शन हाऊसचा सिनेमा मिळाला असला तरी यापुढे तिला अभिनय करावा लागेल आणि ते जमलं तरच पुढची वाटचाल शक्य आहे. नाहीतर परत एकदा कँलेडरवर तिचं भवितव्य लटकेल.