सनी म्हणते जिस्म २ साठी काहीही करेन

पॉर्न स्टार सनी लियोन जिस्म-२ साठी भरपूर मेहनत घेत आहे. महेश भटच्या जिस्म २ सिनेमात सनी लियोनची प्रमुख भूमिका आहे आणि त्यासाठी ती हिंदी देखील शिकत आहे.

Updated: Feb 2, 2012, 03:19 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

पॉर्न स्टार सनी लियोन जिस्म-२ साठी भरपूर मेहनत घेत आहे. महेश भटच्या जिस्म २ सिनेमात सनी लियोनची प्रमुख भूमिका आहे आणि त्यासाठी ती हिंदी देखील शिकत आहे.

 

मुळ भारतीय-कॅनेडियन वंशाची असलेल्या पॉर्न स्टार सनी लियोनने ट्विटर ट्विट केलं आहे की जिस्म २ च्या भूमिकेसाठी तिने जीम जॉईन केलं आहे आणि ऑडियो कॅसेटच्या माध्यमातून हिंदी देखील शिकत आहे. हिंदी आणि पंजाबी बोलणे हा माझा जन्मसिध्द हक्क असल्याचा साक्षात्कार सनी लियोनला झाला आहे. जिस्म २ या सिनेमाने मला एक मोठा ब्रेक दिला आहे आणि त्याबद्दल मी आभारी आहे असं सनी लियोनने म्हटलं आहे.

 

बिग बॉस सिझन ५ मध्ये सहभाग घेण्यासाठी आलेल्या सनीला महेश भटने जिस्म २ ची ऑफर दिली. आता या सिनेमातील भूमिकेसाठी ती भरपूर मेहनत घेत असली तरी तिच्याकडे भरपूर काही आहे आणि त्यामुळेच महेश भटने तिला ब्रेक दिला आहे.