www.24taas.com, मुंबई
आज रिलीज झालेल्या क्या सुपरकूल है हम या सिनेमात कॉमेडीचा जबरदस्त तडका आहे. सिनेमात धमाल, मस्ती आणि टाइमपास मटेरियलची रेलचेल आहे. ए सर्टिफिकेट घेऊन रिलीज झालेल्या या सिनेमाने सेंसॉर बोर्डाची झोपच उडवली होती.
या सिनेमात आदि आणि सिड या दोन भावंडांची कथा आहे. बोल्ड कंटेंन्ड या शब्दाला जागत या सिनेमात अनेक द्व्यर्थी संवाद आणि अश्लिलतेची जोड आहे. कथेची उणिव बोल्डनेस, अश्लिलता, वाह्यात जोक्स आणि हिडिस संवादांनी भरून काढली आहे.
क्या कूल है हम या एडल्ट कॉमिडीचा हा दुसरा भाग आहे. या सिनेमात विशेष असं काहीच नाही. तरीही चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंत हा सिनेमा ठीक वाटतो.परंतु नंतर कुत्र्याचे सीन्स आणि तेच जुने-पुराणे जोक्स पुनःपुन्हा येऊ लागतात, तेव्हा चित्रपट थोडा रटाळ वाटू लागतो. खरंतर या सीन्सशिवाय हा सिनेमा १५ ते २० मिनिटांनी लहान झाला आसता. तो जास्त एंजॉय करता आला असता. हे सर्व असलं तरी चित्रपटाचे चित्रीकरण मात्र चांगले आहे. दिगदर्शकाला जे दाखवायचं ते चित्रपटातून दिसून येतं. संगीत दिग्दर्शनामुळे चित्रपट थोडा कमकुवत झाल्याचे दिसून येते.