करीना - रणबीर सिनेमासाठी येणार एकत्र

करीना कपूर आणि रणबीर कपूर... या दोन झळाळत्या स्टार्सना एकत्र पाहण्याची अनेकांची इच्छा... पण, खऱ्याखुऱ्या लाईफमध्ये चुलत भाऊ-बहिण असलेल्या या दोघांनीही आपण कधीही एकत्र रोमांटीक भूमिका करणार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे बऱ्याच जणांना वाटलं की आता हे दोघं कधीच एकत्र काम करणार नाहीत. पण या सगळ्यांना खोटं ठरवतं आता ही दोघंही एकत्र दिसणार आहेत...

Updated: Jul 27, 2012, 12:06 PM IST

www.24taas.com, मुंबई

करीना कपूर आणि रणबीर कपूर... या दोन झळाळत्या स्टार्सना एकत्र पाहण्याची इच्छा अनेकांना आहे... पण, खऱ्याखुऱ्या लाईफमध्ये चुलत भाऊ-बहिण असलेल्या या दोघांनीही आपण कधीही एकत्र रोमांटीक भूमिका करणार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे बऱ्याच जणांना वाटलं की आता हे दोघं कधीच एकत्र काम करणार नाहीत. पण या सगळ्यांना खोटं ठरवतं आता ही दोघंही एकत्र दिसणार आहेत...

 

दिग्दर्शक झोया अख्तर हिनं ही किमया साधलीय. तीनं दोघांनाही एकत्र काम करायला भाग पाडलंय. चुलत भाऊ-बहिण असलेले करीना आणि रणबीर झोयाच्या फिल्ममध्येही भावा-बहिणीच भूमिका साकारणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘तलाश’ फिल्मच्या शुटींगच्यच वेळी झोयानं या तिच्या आगामी प्रोजेक्टची कथा करीनाला ऐकवली. करीनाला ही कथा इतकी आवडली की तिनं लागलीच या भूमिकेसाठी हो म्हटलं. आता प्रश्न होता भावाच्या भूमिकेचा... आणि झोयाच्या नजरेसमोर पहिल्यांदा रणबीर आला. तिनं ही कथा रणबीरलाही ऐकवली, आणि महत्त्वाचं म्हणजे रणबीरलाही त्याची भूमिका खूपच पसंत पडली. त्यानंही होकार दिला. आणि दोघंही आता या सिनेमाचं शुटींग कधी सुरू होणार याची वाट पाहत आहेत.

 

करिना आणि रणबीर करणार असलेला हा सिनेमा भावा – बहिणीच्या संबंधांवर आधारित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा सिनेमा खऱ्याखुऱ्या भावा-बहिणीच्या म्हणजेच फरहान अख्तर आणि झोया अख्तर यांच्याच जीवनावर आधारित आहे.

 

.