आता स्वयंवर वीणाचे !

वीणा मलिक... बिग बॉसमुळे चर्चेत आलेली ही पाकिस्तानी स्टार आता स्मॉलस्क्रीनवर आणखी एका शोमुळे चर्चेत येणारेय. पाकिस्तानी स्टार वीणा मलिक आता हिंदी सिनेसृष्टीतंच नाही तर स्मॉल स्क्रीनवरंही आपला जम बसवू पाहतेय.

Updated: Nov 10, 2011, 08:00 AM IST

झी २४ तास वेब टीम, मंबई

वीणा मलिक... बिग बॉसमुळे चर्चेत आलेली ही पाकिस्तानी स्टार आता स्मॉलस्क्रीनवर आणखी एका शोमुळे चर्चेत येणारेय. पाकिस्तानी स्टार वीणा मलिक आता हिंदी सिनेसृष्टीतंच नाही तर स्मॉल स्क्रीनवरंही आपला जम बसवू पाहतेय.

बिग बॉसमध्ये आपल्या अश्लील कृत्यांमुळे वादात सापडलेल्या वीणा मलिकला पुन्हा वादात सापण्याची संधी मिळमारेय ती स्वयंवरच्या चौथ्या सिझन मधून. स्वयंवर या गाजलेल्या वेडिंग रिएलिटी शो मधून वीणा आपल्य़ाला सुटेबल अशा वराचा संशोधन करणारेय.

त्यासाठी चक्क तिला साडे चार कोटींच्या मानधनाची ऑफर मिळालीय. त्यामुळे वीणा ही संधी सोडेल असं वाटत नाही. मात्र तिनं या स्वयंवरात लग्न केल नाही तर मात्र तिच्या मानधनाचा आकडा घसरुन 3 कोटींवर येईल.