अण्णांचा सरकारवर हल्लाबोल

Updated: Nov 29, 2011, 03:24 PM IST

झी २४ तास वेब टीम, राळेगण सिध्दी

 

अण्णा हजारेंनी राळेगण सिध्दीमध्ये पत्रकार परिषदेत जन लोकपालच्या मागण्या मसुद्यात अमान्य असल्याचं सांगितलं. पंतप्रधानांनी लिखीत आश्वासन दिलं होतं. तरीही केंद्र सरकारने विश्वासघात केला असा हल्लाबोल अण्णांनी सरकारवर केला. सरकारला याची किंमत मोजावी लागेल असा इशाराही अण्णांनी दिला आहे. सरकारचे लोकपाल बिल कुचकामी. सीबीआयला स्वायत्तता नाही. सीबीआयलाही लोकपालच्या कक्षेत आणा. कनिष्ठ कर्मचारीही लोकपालच्या कक्षेत आणा. सर्व कर्मचाऱ्यांना लोकपालच्या कक्षेत आणा. न्यायापालिकेबाबत फक्त सरकारने बिल बनवू नये अशी मागणी अण्णांनी केली.

 

भ्रष्टाचार मिटवण्याची तयारी नसल्याचा आरोपही त्यांनी केला. अण्णा हजारेंचा पुन्हा आंदोलनाचा इशारा देताना ११ डिसेंबरला एक दिवसाचे उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आणि त्या दिवशी जनतेने देखील रस्त्यावर उतरुन आंदोलन करावं असं आवाहनही अण्णांनी केलं. सरकारने तरी देखील सकारात्मक पाऊल उचललं नाही तर २७ तारखेला रामलीला मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचं अण्णांनी सांगितलं.

Tags: