अनाथ मुलांवर लैंगिक अत्याचार

दिल्ली भागात असलेल्या आर्य अनाथालयात तब्बल आठ मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येताच दिल्ली परीसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पिडीत मुलांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आहे.

Updated: Feb 22, 2012, 05:20 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

देशाची राजधानी दिल्ली नेहमीच चर्चेत असते. मात्र या वेळी देशाच्या राजधानीत घ़डलेल्या प्रकारानं सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. राजधानीच्या मधोमध असलेल्या या आर्य अनाथालयात घडलेल्या घटनेमुळं सर्वानाचं धक्का बसला आहे. दिल्ली भागात असलेल्या  आर्य अनाथालयात तब्बल आठ मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येताच दिल्ली परीसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पिडीत मुलांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आहे.

दिल्ली परीसरातल्या आर्य अनाथलायात असलेल्या आठ मुलांवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर येताच दिल्ली भागातील इतर अनाथालायात काय परिस्थिती आहे आणि अशा अनाथालयात राहणाऱ्या इतर मुलांचीही चौकशी व्हावी असा सवाल इतर स्वयंसेवी संस्थाकडून होत आहे. देशाच्या राजधानीसारख्या भागात लहान मुलांवर अशा पध्दतीने अत्याचाराची माहिती समोर येताच दिल्ली प्रशासनाचे डोळे उघडले आणि या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देत दिल्ली प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.

 

पोलिसांनी जेव्हा या अनाथआलयात जाऊन चौकशी केली तेव्हा या अनाथालयातील मुलांना देण्यात येणाऱ्या मुलभूत सुविधा अतिशय निकृष्ट दर्जाच्या असल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच या आनाथालयात मर्यादेपेक्षा जास्त मुलांना विनापरवाना ठेवण्यात आल्याची ही माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत असून पोलिसांनी या अनाथालयाच्या मुख्याध्यापकाला अटक केली आहे.