अनुजच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास बक्षिस

पुण्याच्या अनुज बिडवेच्या हत्येचा तपास करणाऱ्या ब्रिटिश पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध लावण्यासाठी मदत करणाऱ्याला ५० हजार पाउंडचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. तसंच यासंबंधी माहिती देण्यास विलंब झाल्या बद्दल बिडवे कुटुंबियांची माफी पोलिसांनी मागितली आहे

Updated: Dec 31, 2011, 08:40 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई 

 

पुण्याच्या अनुज बिडवेच्या हत्येचा तपास करणाऱ्या ब्रिटिश पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध लावण्यासाठी मदत  करणाऱ्याला ५० हजार पाउंडचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. तसंच यासंबंधी माहिती देण्यास विलंब झाल्या  बद्दल बिडवे कुटुंबियांची माफी पोलिसांनी मागितली आहे. बिडवे कुटुंबाला अनुजच्या मृत्यूची बातमी फेसबुकवरुन  मिळाली.

 

२३ वर्षीय अनुज बिडवेला अत्यंत जवळून गोळी घालण्यात आली. बिडवे आपल्या मित्रांसोबत ग्रेटर मँचेस्टर जिल्ह्यात आपल्या मित्रांसोबत फिरण्यास गेला होता. मँचेस्टर पोलिसांनी ही हत्या वर्णद्वेषातून झाल्याचं म्हटलं आहे. पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांयकाळी मारेकऱ्यांच्या बाबतीत माहिती देणाऱ्यास ५० हजार पाऊंड बक्षिस देण्याची घोषणा केली. आणि त्यामुळे मारेकरी लवकर पकडले जातील अशी आशा व्यक्त केली. पोलिसांनी पकडलेल्या १६ आणि १७ वर्षीय युवकांची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. तर १९ आणि २० वर्षीय दोन युवक अद्याप पोलिस कोठडीत आहेत. पोलिसांनी ही अत्यंत घृणास्पद हत्या असल्याचं म्हटलं आहे आणि त्यामुळेच कडक कारवाई करण्याची पावलं उचलण्यात आली आहे.

Tags: