आता २ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज लोकसभेत २०१२-१३चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना २ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल असे जाहीर केले आहे. त्यामुळे आता तुमचे २ लाखांचे उत्पन्न असेल तर तुम्हाला कर भरावा लागणार नाही.

Updated: Mar 16, 2012, 12:43 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज लोकसभेत २०१२-१३चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना २ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल असे जाहीर केले आहे. त्यामुळे आता तुमचे २ लाखांचे उत्पन्न असेल तर तुम्हाला कर भरावा लागणार नाही.

 

 

पूर्वी १.८० लाखांचे  उत्पन्न करमुक्त होते. यात आता २० हजार रूपयांची भर पडली आहे. त्यामुळे फारसा फरक न पडल्याने सर्वसामान्य नागरिकाच्या खिशाला कराच्या माध्यमातून  कात्री  लागणार आहे.  २ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कर नसला तरी त्यापुढील पैशावर कर मोजावा लागणार आहे.

 

अर्थसंकल्पाचील ठळक वैशिष्ट्ये

 

कर सूट १ लाख ८० हजारावरून २ लाख करण्यात आली

२ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कर नाही

२ ते ५ लाख उत्पन्न १० टक्के टॅक्स

५ ते १० लाख उत्पन्न २० टक्के टॅक्स

१० लाखांच्या वर उत्पन्न ३० टक्के टॅक्स

एक लाख ० रुपये टॅक्स

 

सामान्यांना काय होणार फायदा...

एक लाख रुपये उत्पन्न, तुमचा फायदा ० रुपये

दोन लाख रुपये उत्पन्न तुमचा फायदा ० रुपये

तीन लाख रुपये उत्पन्न तुमचा फायदा ० रुपये

चार लाख रुपये उत्पन्न तुमचा फायदा ६१८० रुपये

पाच लाख रुपये उत्पन्न तुमचा फायदा ६१८० रुपये

सहा लाख लाख रुपये उत्पन्न तुमचा फायदा ६१८० रुपये

सात लाख रुपये उत्पन्न तुमचा फायदा १०३०० रुपये

आठ रुपये उत्पन्न तुमचा फायदा १०३०० रुपये

नऊ लाख रुपये उत्पन्न तुमचा फायदा १०३०० रुपये

दहा लाख रुपये उत्पन्न तुमचा फायदा १८५४० रुपये