कलमाडी जाणार 'ऑलिम्पिक'ला...

सुरेश कलमाडी आता ऑलिम्पिकच्या मैदानात दिसणार आहेत. कारण आता त्यांना भारताबाहेर जाण्याची परवानगी मिळालीय. दिल्ली कोर्टानं ही परवानगी दिलीय.

Updated: Jul 13, 2012, 04:47 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

सुरेश कलमाडी आता ऑलिम्पिकच्या मैदानात दिसणार आहेत. कारण आता त्यांना भारताबाहेर जाण्याची परवानगी मिळालीय. दिल्ली कोर्टानं ही परवानगी दिलीय.

 

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अनेक दिवस तुरुंगात घालवलेले सुरेश कलमाडी अजूनही इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशन काऊन्सिलचे सदस्यही आहेत. हेच कारण पुढे करून कलमाडी यांनी आपल्याला लंडनमध्ये होणाऱ्या ऑलिम्पक स्पर्धेसाठी जाण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका सीबीआय कोर्टाकडे केली होती. याच याचिकेवर दिल्ली कोर्टानं १० लाखांच्या जातमुचलक्यावर ही परवानगी त्यांना दिलीय. त्यामुळे २६ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान कलमाडींना लंडन ऑलिम्पिकला हजेरी लावता येणार आहे.

 

२५ एप्रिल २०११ रोजी सुरेश कलमाडी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिहार येथील कारागृहात ९ महिन्यांचा कारावास भोगल्यानंतर २० जानेवारी २०१२ रोजी त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.