झी २४ तास वेब टीम, बेळगाव
[caption id="attachment_4389" align="alignleft" width="300" caption="१ नोव्हेंबर १९५६ काळा दिवस"][/caption]
बेळगावमध्ये गेल्या ५६ वर्षांपासून ०१ नोव्हेंबर हा काळादिवस साजरा केला जातो. ०१ नोव्हेंबर १९५६ साली भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह ६५५ खेडी कर्नाटकने डांबून ठेवली. याचा निषेध म्हणून दरवर्षी ०१ नोव्हेंबरला शहराच्या दक्षिण भागात एकीकरण समितीच्या वतीने काळ्या फिती लावून सायकल फेरी काढण्यात येते.
हजारो मराठी भाषिक या सायकल फेरीत सहभागी होतात. तर दुसरीकडे बेळगाव बाहेरील कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते कर्नाटक राज्यत्सोवाची मिरवणूक काढतात. कर्नाटक सरकारने या मिरवणुकीला विनाअट परवानगी दिली आहे, तर एकीकरण समितीच्या लोकशाही मार्गाने आणि शांततेत काढल्या जाणा-या सायकल फेरीला मात्र सशर्त परवानगी दिली आहे. 20 लाख सीमावासीय कर्नाटकात आजही जखडले आहेत म्हणूनच दरवर्षी ०१ नोव्हेंबरला बेळगावसह सीमा भागात काळा दिवस आयोजित करण्यात येतो.