मुंबई, दिल्ली आणि कोलकत्याच्या लोकसंख्येने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत! २००११ च्या जनगणनेच्या प्राथमिक माहितीनुसार, ही तिन्ही शहरे 'महाकाय' म्हणून पुढे आली आहे. कोलकत्याचा अपवाद वगळता दोन्ही शहरांची लोकसंख्या दीड कोटीच्या पुढे गेली आहे.
मुख्य शहराची विस्तारित शहरे आणि उपनगरे यांची मिळून लोकसंख्या विचारात घेता दिल्लीने पहिला क्रमांक पटकावला आहे. दिल्लीसह दिल्ली केंद्रशासित प्रदेश, गुरगाव, फरिदाबाद, नोएडा आणि गाझियाबाद यांची एकत्रित लोकसंख्या आहे २ कोटी १७ लाख ५३ हजार ४८६ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, भिवंडी आणि पनवेल यांची एकत्रित लोकसंख्या भरते २ कोटी ७ लाख ४८ हजार ३९५ या दोन्ही शहरांच्या तुलनेत 'कोलकता एक्स्प्रेस'चा वेग थोडा 'कमी' आहे.
लोकसंख्या वाढीमध्ये बाजी मारली आहे मुंबईने. मुंबईची लोकसंख्या पावणेदोन कोटींच्या पुढे गेली असून, नेमका आकडा आहे १ कोटी ८४ लाख १४ हजार २८८. मुंबईखालोखाल आहे दिल्ली. देशाच्या राजधानीची लोकसंख्याही पावणेदोन कोटींच्या उंबरठ्यावर आहे. दिल्लीचा आकडा आहे १ कोटी ६३ लाख १४ हजार ८३८ त्यानंतर क्रमांक लागतो कोलकत्याचा. कोलकत्याची लोकसंख्या आहे १ कोटी ४१ लाख १२ हजार ५३६.
अन्य शहरांची लोकसंख्या - बरेली (९ लाख ७९ हजार ९३३), म्हैसूर (९लाख ८३ हजार ८९३), तिरुपूर (९ लाख ६२ हजार ९८२), सोलापूर (९ लाख ५१ हजार ११८), हुबळी-धारवाड (९ लाख ४३ हजार ८५७), सालेम (९ लाख १९ हजार १५०), अलीगढ (९ लाख ९ हजार ५५९), गुरगाव (९ लाख १ हजार ९६८)